त्या पसार डम्पर चालकास काही तासांतच अटक..आमदार सोनवणे दाम्पत्यास २ दिवस बेड रेस्ट..

 त्या पसार डम्पर चालकास काही तासांतच अटक..आमदार  सोनवणे दाम्पत्यास २ दिवस बेड रेस्ट.. 

 चोपडा दि.२८(प्रतिनिधी):   आमदार सौ.लताताई सोनवणे यांच्या कारला भीषण अपघात करून फरार झालेल्या डंम्पर चालकास पोलिसांनी  अवघ्या काही तासांतच डंपर मालकाच्या घरून शिताफीने अटक केली आहे.अटक करण्यात आलेल्या चालकाचे नाव चेतन सुभाष सोनवणे ( रा.आव्हाणे) असे आहे.दरम्यान आमदार सोनवणे दाम्पत्यास डॉक्टरांनी दोन दिवस बेड रेस्टचा सल्ला दिला असून कार्यकर्त्यांनी परिस्थिती समजून घ्यावी असे  आवाहन पदाधिकाऱ्यांनी  केले आहे.* 

काल  रात्री च्या सुमारास भरधाव वेगाने जाणाऱ्या  गौण खनिज वाहतूक डंम्परने  आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या चारचाकी ईनोव्हा कारला जबर धडक दिली त्यात माजी आमदार अण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे,अंगरक्षक पोलीस नाईक अमित पिजांरी आणि चालक दीपक पवार हे जखमी झाले.अपघात घडताच अंधाराचा फायदा घेत  डंम्परचा चालक चेतन सुभाष सोनवणे (रा.आव्हाणे )हा पसार झाला होता . पोलिसांनी लागलीच जोरदार तपास चक्रे फिरवित अवघ्या काही तासांतच डंपरचे मालकाच्या (क्र.एम.एच.19 झेड 6245)  मेहरूण परिसरातील घरून  चालक चेतन सोनवणे यास अटक करुन जेलची हवा दाखविली आहे. 

 ही कारवाई पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश सायकर,नयन पाटील, श्री.लोखंडे,संदीप पाटील,किरण आगोणे, विश्वनाथ गायकवाड यांच्या पथकाने केली .

 कुरवेल ते तावसा या रस्त्याचे आमदार लता सोनवणे यांच्याहस्ते भूमिपूजन होते. तो कार्यक्रम आटोपून आमदार सोनवणे यांच्यासह त्यांचे पती चंद्रकांत सोनवणे हे रात्री आपल्या इनोव्हा कार (एम.एच. 19 बी.यू. 0999) ले चोपड्याकडून जळगावकडे येत असताना रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास तालुक्यातील करंज गावाजवळ जळगावकडून चोपड्याकडे जाणार्‍या भरधाव डंपर (क्र.एम.एच.19 झेड 6245) ने आमदार लता सोनवणे यांच्या वाहनाला जबर धडक दिल्याने झाला होता. या धडकेत इनोव्हा वाहनाचा पुढील भागाचा पूर्णपणे चुराडा झाला. 

याप्रकरणी चालक दीपक सुभाष पवार यांच्या फिर्यादीवरून डंपर चालकाविरुद्ध जळगाव तालुका पोलिसात गुरनं१४५/२०२३भादंवि कलम २७९,३३७, मोटार वाहन कायदा कलम १८४,१३४ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात  आला आहे..

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने