बुऱ्हाणपूर जिल्हाधिकारींची भेट घेणार..केळी भावा साठी नवनिर्वाचित सभापतींचे एकमत
चोपडा दि.२६(प्रतिनिधी):केळीच्या घसरलेल्या बाजारभावासंदर्भात रावेर,यावल,चोपडा,भुसावळ आणि मुक्ताईनगर-बोदवड बाजार समितीच्या नवनिर्वाचित सभापतींची महत्वाची बैठक संपन्न झाली.या बैठकीत केळीबाबत बुऱ्हाणपूर केळी बोर्डाचा प्रभाव असून याबाबत थेट बुऱ्हाणपूर जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांच्या अखत्यारीत असलेल्या केळी बोर्डाच्या बाजारभावांबाबत योग्य तोडगा निघावा यासाठी जळगांव जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची लवकरच बैठक घेण्याबाबत एकमत झाले.
या बैठकीस ,यावल बाजार समितीचे सभापती श्री हर्षल पाटील,रावेर बाजार समितीचे सभापती सचिन पाटील, मुक्ताईनगर-बोदवडचे सभापती श्री सुधीरभाऊ तराळ,भुसावळचे सभापती श्री अनिल वारके,चोपड्याचे सभापती श्री नरेंद्र पाटील माज़ी जी प सदयस् रमेश नगराज पाटिल,या बैठकीस उपस्थित होते.*