सूरमाज फाउंडेशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांनाचा सत्कार
चोपडा दि.३१(प्रतिनिधी)
शैक्षणिक, धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यात नेहमी योगदान देणाऱ्या सूरमाज फाऊंडेशनने मुस्तफा अँग्लो उर्दू हायस्कूल चोपडा व प्रताप विद्या मंदिर चोपडा येथील बारावीच्या टॉपर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या सत्कार समारंभ मंगळवार 30 मे 2023 रोजी आयोजित केला होता.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे शेख अब्दुल गनी मोहम्मद उस्मान (रिटायर सुपरवाइजर, मुस्तफा एंगलो उर्दू हाई स्कूल चोपड़ा), रमेश जी शिंदे ( माजी नगरसेवक चोपड़ा) व फातिमा हमीद खान पठान (माजी नगरसेवक वह महिला शहर अध्यक्ष चोपड़ा) यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना गौरविण्यात
या सत्कारार्थी गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये 1. कुमारी शिफा सिद्दीका शेख हबीबुल्लाह (विज्ञान) 2. कुमारी तेली महीन हारून (विज्ञान) 3. कुमारी शेख फरजाना माजिद (विज्ञान) 4. कुमारी लहेबा नूर शाहिद खान (कला) 5. कुमारी नमेरा परवीन मंजूर मुजावर (कला) 6. कुमारी शेख सानिया परवीन अनिसोद्दीन (कला) 7. कुमारी सैय्यद लिज़ा नाज़ एजाज अली (कला)
8. कुमारी मिस सय्यद आरजू शरीफ (कला)यांचा समावेश असून त्यांना पुष्प गुच्छ आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी हाजी उस्मान शेख (अध्यक्ष सूरमाज फाऊंडेशन) विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, माध्यमिक व उच्च माध्यमिक मध्ये तुम्ही लोकांनी ज्याप्रकारे मेहनत घेतली आहे, त्याच पद्धतीने तुम्ही तुमची मेहनत यापुढेही कायम ठेवून आपल्या शहराचे, समाजाचे व देशाचे नाव उंचवा,ही काळाची गरज असून त्याशिवाय दुसरा पर्याय नाही, त्यासोबतच डॉ.एम.डी.रागीब यांनी सांगितले की, कोणत्याही विद्यार्थ्याला शिक्षण घेण्यास काही अडचण असल्यास विद्यार्थ्याने सूरमाज फाऊंडेशनशी संपर्क साधावा. त्यांना नक्कीच मदत करण्यात येईल . गुणवंत विद्यार्थ्याने फाऊंडेशनचे आभार व्यक्त केले
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शेख शमीम (उपाध्यक्ष सूरमाज फाउंडेशन), जियाउद्दीन काझी साहेब, अबुल्लैस शेख, शोएब शेख, जुबेर बैग, प्राध्यापक डॉ मोहम्मद जुबेर शेख व फाऊंडेशनच्या सदस्यांनी मेहनत घेतली.