उत्राण- भातखंडे शिवारात तरुणाचा धारदार शस्त्राने निघृण हत्या
*पाचोरा (प्रतिनिधी श्री राजेंद्र खैरनार) : पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली नं.3 येथील रहिवाशी असलेल्या तरूणाचा अज्ञातांनी धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना अर्ध्यारात्रीच्या सुमारास उघडकीला आली आहे. या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मारेकरी अज्ञात असून हत्या करण्याचे कारण उघड झालेले नाही.
अमोल उर्फ सोनू देविदास पाटील (वय-39 वर्ष) रा. अंतुर्ली नं.3 ता. पाचोरा असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे.
विश्वसनिय सुत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, पाचोरा तालुक्यामधील अंतुर्ली नं.3 येथील रहिवासी अमोल पाटील हा खासगी व्यवसायिक आहेत. दरम्यान, एरंडोल तालुक्यातील भातखंडे व उत्राण शिवारात अमोलची मध्यरात्री अज्ञात मारेकरींनी धारदार वस्तूने वार करून निर्घृण हत्या केल्याचे रविवारी सकाळी समोर आले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. पुढील कारवाईसाठी मृतदेह जिल्हा रूग्णालयात नेण्यात आला आहे. नेमका हा खून करण्यामागचे कारण जरी समोर आलेले नसले तरी जुन्या वादातून झाला असावा असे बोलले जात आहे. पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी पुढील कारवाईला सुरूवात केलेली आहे.