सामान्य ज्ञान व चित्रकला स्पर्धेचे बक्षिस वितरण संपन्न

 

सामान्य ज्ञान व चित्रकला स्पर्धेचे बक्षिस वितरण संपन्न

भडगाव,दि.२० (प्रतिनिधी)माऊली फाऊंडेशन भडगाव यांच्या वतीने फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री.मनोहरभाऊ सुर्यवंशी यांच्या पत्नी तथा माऊली फाऊंडेशनच्या संचालिका सौ दिपाताई मनोहर सुर्यवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त सामान्य ज्ञान स्पर्धा व चित्रकला स्पर्धा  घेण्यात आल्या होत्या. सदर स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त पणे सहभाग नोंदविला होता.

सदर स्पर्धा वाय.एम.खान उर्दु शाळा,आदर्श कन्या शाळा,लाडकुबाई शाळा व बालविकास शाळेंमधील विद्यार्थीनिंसाठी राबविण्यात आली होते.सदर स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ वाय.एम.खान उर्दु शाळेत पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माऊली फाऊंडेशनच्या आधारस्तंभ आई गुंताई सुर्यवंशी ह्या होत्या.प्रमुख उपस्थितांमध्ये माऊली फाऊंडेशनचे उपाध्यक्ष युवराजआबा सुर्यवंशी,सामाजिक कार्यकर्त्या तथा नगरसेविका योजनाताई पाटील,माऊली फाऊंडेशनच्या संचालिका संगिता जाधव,वाय.एम.खान उर्दु शाळेच्या करीमा खान मँडम,लाडकुबाई शाळेच्या प्राचार्य वैशाली शिंदे,मंगलाताई सुर्यवंशी,लक्ष्मीबाई सुर्यवंशी,जाकिर दादा कुरेशी,भिमराव सुर्यवंशी,रोकडे सर आदी उपस्थित होते.कार्यक्रम प्रसंगी मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.सदर स्पर्धेत भाग घेणाऱ्या 40 विद्यार्थींनींना प्रमाणपत्र,टिफीन व गुलाबपुष्प देऊन सन्मानीत करण्यात आले.सदर प्रसंगी माऊली फाऊंडेशनच्या संचालिका संगिता जाधव यांनी माऊली फाऊंडेशनच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच युवराजआबा सुर्यवंशी,जाकिर कुरैशी,सुरेश रोकडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रम प्रसंगी सौ.दिपाताईंच्या वाढदिवस केक कापुन साजरा करण्यात येऊन अल्पोहारही देण्यास आला.सदरप्रसंगी मनिषा पाटील,अश्विनी पाटील,योगिता सोनार,देवेंद्र पाटील,सुशिल महाजन,योगेश शिंपी,दिलिप महाजन,संजय सपकाळे,रवीभाऊ,संजय सोनार कळवाडीकर तसेच आदर्श कन्या शाळा,वाय.एम.उर्दु शाळा,लाडकुबाई शाळा,बालविकास शाळेतील शिक्षकवृंद,शिक्षिका व पालक उपस्थित होते.कार्यक्रमाची प्रस्तावना प्रतिभा कुलकर्णी,सुत्रसंचलन गणेश पाटील तर आभार प्रदर्शन वैशाली पाटील यांनी केले.कार्यक्रमासाठी शाळा उपलब्ध करुन दिल्याबद्दल माऊली फाऊंडेशनच्या वतीने शाळेचे,करीमा खान मँडम व शाळेतील सर्व शिक्षकवृंद व शिक्षिका यांचे आभार व्यक्त करण्यात आले.*

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने