पंकज प्राथमिक विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी...
चोपडा दि.२०(प्रतिनिधी):- पंकज प्राथमिक विद्यालयात शिवजयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. सर्व प्रथम शालेय परिसरात रॅली काढण्यात आली. प्रतिमा पुजन विद्यालयाचे मुख्याध्यापक एम व्ही पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.राज्यगीत सर्व उपस्थित शिक्षक व विद्यार्थी यांनी गायन केले.
तद्नंतर एकच राजा इथे जन्मला,
का जगभर साजरी होते माझा राजाची जयंती दरवर्षी आदी गीते व नृत्ये विद्यार्थ्यांनी सादर केली.
यशश्री चव्हाण, अंकीता पवार, उत्कर्षा रायसिंग, रेवती पाटील, भुवनेश्वरी पाटील, भार्गवी पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले तर पार्थ जाधव , दिव्या माळी , हिमांशू नेरपगार व गृप आदिंनी नृत्य सादर केली. विद्यालयाचे शिक्षक सी आर चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा विद्यालयाचे मुख्याध्यापक एम व्ही पाटील यांनी आपल्या मनोगतातुन सांगितले की, शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. अन्याय, अत्याचार याविरूद्ध लढा दिला व आदर्श राज्यांची स्थापना केली .आज आपण सर्वांनी शिवाजी महाराज यांच्या विचाराचे अनुकरण करावे व त्यांचा आदर्श घ्यावा असे आवाहन केले.
व्यासपीठावर मुख्याध्यापक एम व्ही पाटील, सी एस जाधव, ए सी पाटील, सी आर चौधरी, श्रीम गायत्री शिंदे, आर डी पाटील, उज्ज्वला जाधव, प्रियंका पाटील, तेजश्री ठाकरे, जयश्री हिंगे, संध्या पाटील , सुनंदा विसावे,मनोज अहिरे, गोपाल पाटील, महेश गुजर, प्रफुल्ल महाजन, स्वप्नील ठाकूर, मयूर पाटील, मुकेश पाटील, नितिन वाल्हे आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी विजय सोनवणे, कैलास बोरसे, दिलीप बाविस्कर, प्रमोद पाटील आदींनी परिश्रम घेतले.