रोटरी क्लब हा सामाजिक बांधिलकी जोपासणारा क्लब.... भरत अमळकर

 रोटरी क्लब हा सामाजिक बांधिलकी जोपासणारा क्लब.... भरत अमळकर

  चोपडा,दि.२१ (प्रतिनिधी):-  रोटरी क्लब चोपडा च्या 52 व्या चार्टर डे ला कार्यक्रमाचे अध्यक्ष भरत अमळकर म्हणाले कि, समाज विकासाच्या कामात रोटरी क्लब ऑफ चोपडाचे योगदान मोठे आहे. शिक्षण, आरोग्य, कृषी, सामाजिक, कला, जलसंवर्धन या क्षेत्रांत केलेले कार्य विशेष वाखाण्याजोगे आहे. तळागाळातील समाजासाठी रोटरीतर्फे राबविण्यात येत असलेले उपक्रम कौतुकास्पद आहेत. ही संस्था सामाजिक क्षेत्रातील गुरू असल्याचे प्रतिपादन केशव स्मृती प्रतिष्ठानचे भरत अमळकर यांनी केले.

सामजिक काम म्हणजे आपलं काम अत्यंत प्रामाणिकपणे करणे. काम करण्याची प्रेरणा समाजच देत असतो.समाजसेवा हा पुण्यसंचय आहे. जेव्हा माणूस स्वतः पेक्षा इतरांसाठी आनंद शोधतो तेव्हा माणूस अधिक आनंदी होतो. इतरांसाठी निरपेक्ष काम करा. गरजू लोकांसाठीचे विविध प्रकल्प राबवावेत असेही त्यांनी सुचविले. पैशांपेक्षा आज वेळेची कमतरता असल्याचे त्यांनी सांगितले.

 तसेच चार्टर डे चे अवचित्त साधून विविध क्षेत्रातील मान्यवरांना रोटरी तर्फे मानाचा व्होकेशनल सर्व्हिस अवॉर्ड देण्यात आला.

प्रकाश गायकवाड (वायरमन) रवींद्र पवार (परिचारक) दिपक दिक्षित (पोस्टमन) चेतना कापुरे (आशा सेविका) गणेश सोनार (शिपाई) प्रशांत पाटील (शवविच्छेदक) विष्णू पाटील (चालक 2000) विजय चावरे (सफाई कर्मचारी) संगीता पाटील (वाहक 65147) यांना व्होकेशनल सर्व्हिस अवॉर्ड मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.

   व्यासपीठावर रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष ॲड रूपेश पाटील, मानद सचिव गौरव महाले, प्रमुख वक्ते भरत अमळकर, उप प्रांतपाल नितीन अहिरराव, प्रकल्प प्रमुख प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.

  प्रमुख पाहुण्यांचा परिचय व्ही एस पाटील यांनी केले. तर सूत्रसंचालन राधेश्याम पाटील यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने