जळगावच्या आर.आर.फाऊंडेशन व सौ.स्वाती अजय राजे बाविस्कर यांच्या सहयोगाने विखरणला मोफत आरोग्य तपासणी व चष्मा वाटप शिबीर

 जळगावच्या आर.आर.फाऊंडेशन  व सौ.स्वाती अजय राजे बाविस्कर यांच्या सहयोगाने विखरणला मोफत आरोग्य तपासणी व चष्मा वाटप शिबीर


जळगाव दि.१०(प्रतिनिधी महेश शिरसाठ)* आर. आर. फाऊंडेशन, जळगाव व ताईसो. सौ. स्वाती अजयराजे बाविस्कर (बाळासाहेबांची शिवसेना, एरंडोल व महिला प्रदेश अध्यक्षा कोळी समाज महाराष्ट्र) यांच्या संयुक्त विद्यमाने  दि.१४/०२/२०२३ रोजी सकाळी १०ते ४:०० वाजेच्या दरम्यान एरंडोल तालुक्यातील विखरण गावी मराठी शाळेत मोफत विविध आजारांवरील आरोग्य तपासणी व चष्मा वाटप शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

शिबिरात मोफत मुतखडा, मुत्रपिंडातील खडे, प्रोस्टेट, पित्ताशय खडा तपासणी,* प्लीहा (Spleen) * विविध प्रकारच्या गाठी थायरॉईड पाईल्स * भगंदर *फिशर * डायबेटिक फूट हर्निया अल्सर आतड्यांमधील अडथळे * अपेंडीक्स * आतड्यातील पीळ आतड्यांचे क्षयरोग हायड्रोसिल तसेच  सर्व प्रकारच्या तपासणी, E.C.G. कार्डीओग्राफी, मधुमेह, रक्तदाब सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया व  चष्मा वाटप मोफत होणार आहे तसेच मानसोपचार विभाग
आपला मुलगा अभ्यासात मागे आहे का ? आपण जास्तच चिडचिड करतात का ? आपल्याला कोणतेही व्यसन आहे का ? अर्घाशिशीच्या समस्यांनी त्रस्त आहात का ? अशा शेकडो प्रश्नावर  मनोविकार तज्ञांकडून मोफत सल्ल्यासह औषधीही दिली जाणार आहे
मोफत नेत्र तपासणी दि. १५/०२/२०२३ रोजी नेत्ररोग तज्ञ डॉ. मुकेश पाटील  जळगाव हे करणार आहेत. व मोफत चष्मा वाटप   केले जाणार आहे तरी जास्तीत जास्त रुग्णांनी रुग्ण सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन
आयोजक  सौ.स्वाती अजयराजे बाविस्कर  व अजयराजे प्रल्हाद बाविस्कर यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने