जळगाव एम.ए.आर.अँग्लो ऊर्दू हायस्कूलमध्ये फातिमाबी शेख जयंती साजरी
[ सत्यशोधक समाजातर्फे आयोजित स्पर्धांचे प्रमाणपत्र वितरण ]
जळगाव दि.१२(प्रतिनिधी): एम.ए.आर.अँग्लो उर्दू हायस्कूल, जळगाव येथे दिनांक ९ जानेवारी २०२३ रोजी उपमुख्याध्यापक शेख मोहम्मद फारूक अमीर यांच्या अध्यक्षतेखाली सावित्रीबाईंच्या सहकारी शिक्षिका फातिमाबी शेख यांची जयंती उत्साहात संपन्न झाली.सत्यशोधक समाज संघ,जळगाव आयोजित शाळास्तरीय सुंदर हस्ताक्षर व रंगभरण स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या. विद्यार्थ्यांचा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.सत्यशोधक समाज संघ अधिवेशनाच्या ( पानाचे कुऱ्हे ) औचित्याने महात्मा ज्योतिराव फुले यांचे सत्यशोधकीय कार्य विद्यार्थी व कुटूंबियांपर्यंत पोहोचावे आणि विद्यार्थ्यांमध्ये मानवी मुल्यांची जोपासना होऊन ते सत्यशील , समाजाभिमुख निर्भय देशप्रेमी होऊन त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्दिष्टपुर्तीसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
स्पर्धानिहाय गुणवंत विद्यार्थी पुढील प्रमाणे - *सुंदर हस्ताक्षर स्पर्धा - इयत्ता ७ वी * : -* प्रथम क्रमांक : - मलिक मैमोना ऐजाज मलिक * द्वितीय क्रमांक - खान अर्शिया अफजल * तृतीय क्रमांक - ( विभागून ) खान सबा नाझ इम्रान व तौहरा मुखतार खान
*रंगभरण स्पर्धा (इयत्ता ६ वी ): -* प्रथम क्रमांक - नुसरत अरिफ पिंजारी * द्वितीय क्रमांक - रेहान अमिन पिंजारी * तृतीय क्रमांक - अरिबा शेख अझरुद्दीन
फातिमाबी शेख यांच्या शैक्षणिक कार्याची माहिती मुख्याध्यापक डॉ.बाबू शेख यांनी दिली.स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना थोर शिक्षिका फातिमाबी शेख यांच्या जयंतीच्या औचित्याने सत्यशोधक संघातर्फे मुख्याध्यापक डॉ.बाबू शेख व पर्यवेक्षक नईम शेख व स्पर्धा संयोजक सत्यशोधक विजय लुल्हे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.हस्ताक्षर स्पर्धेचे मूल्यांकन स्पर्धा संयोजक नईम शेख सर व रंगभरण स्पर्धेचे मूल्यांकन मुखतार खान सर यांनी केले.स्पर्धेच्या यशस्वितेसाठी शरीफ खान सरांनी अमूल्य सहकार्य केले.