संत बाबा मेठाराम यांचा ५० वा वार्षिक महोत्सव उत्साहात साजरा
*पाचोरा दि.२३ (प्रतिनिधी राजेंद्र खैरनार)पाचोरा येथे,,सिंधी समाजाचे महान संत बाबा मेठाराम साहेब यांचा "पन्नास" वा वार्षिक महोत्सव मोठ्या हर्षोआनंदात साजरा करण्यात आला. हा महोत्सव सिंधी कॉलनीतील संत बाबा मेठाराम साहेब यांच्या मंदिरात दि. 18 डिसेंबर ते 20 डिसेंबरपर्यंत साजरा करण्यात आला. यावेळी देशामधील अनेक ठिकाणांहून साधु संत उपस्थित होते.
यावेळी तीन दिवस दररोज सकाळी संत बाबा मेठाराम साहेब यांचा प्रतिमेला पंचामृत अभिषेक करून दिवसाची श्रीगणेशा होत होती. तसेच निरनिराळ्या राज्यामधुन आलेल्या संत महात्म्यांचे भक्तीमय कार्यक्रमांचा भक्तांनी मनसोक्त आनंद लुटला. रोज अनेक कार्यक्रमांच्या संदर्भातून सामाजिक बांधिलकी व साधुसंतांप्रती मानसन्मान व समाजाच्या संस्कृतीचे दर्शन घडत होते. अखेरच्या दिनी विविध राज्यांमधील सुमारे पन्नासहून अधिक साधुसंतांचा एकच "पंचवीस" फुटी पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी साधु संतांनी हजेरी देत कार्यक्रमांची शोभा वाढवता समाजात एकता व बंधुभाव निर्माण व्हावा यावर जोर दिला. तसेच देशात शांतता सुखसमृद्धी नांदावी, समाजात एकता अखंडता अबाधित राहावी अशी प्रार्थना केली. यावेळी पाचोरा शहरामधील सर्व समाज बांधव उपस्थित होते. अखेर सर्व उपस्थितांचे पाचोरा सिंधी पंचायतच्या वतीने मुखीसाहेब मोटुमल नागराणी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शहरातील नवयुवक मंडळांनी अविरत परिश्रम घेतले.