राष्ट्रीय शेतकरी दिनाला वाघळीच्या यशवंत पब्लिक स्कूल मध्ये शेतकरी गौरव व प्रदर्शनासह प्रात्यक्षिक

 राष्ट्रीय शेतकरी दिनाला वाघळीच्या यशवंत पब्लिक स्कूल मध्ये शेतकरी गौरव व प्रदर्शनासह प्रात्यक्षिक       

  



गणपूर,ता चोपडा दि. 24(प्रतिनिधी ): राष्ट्रीय शेतकरी दिनाचे औचित्य साधून वाघळी (ता 40 गाव)च्या छत्रपती शिवराय फौंडेशन संचालित यशवंत पब्लिक स्कूल मध्ये शेतकरी गौरव ,विद्यार्थ्यांच्या शेतीविषयक कलाकृतींचे प्रदर्शन व शेती प्रात्यक्षिके करून दाखविण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सच्चिदानंद सूर्यवंशी होते.                   

  यावेळी प्रयोगशील शेतकरी श्रावण पाटील व सच्चिदानंद सूर्यवंशी यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष परमानंद सूर्यवंशी यांनी केला. ज्वारीच्या तोट्यापासून विद्यार्थ्यांनी बनविलेल्या विविध शेतीपयोगी कलाकृतींचे प्रदर्शन यावेळी भरविण्यात आले होते.श्रावण पाटील व सच्चिदानंद सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांच्या शेतीविषयक प्रश्नांना यावेळी उत्तरे दिली.त्याचबरोबर शेतीकामाची प्रात्यक्षिकेही यावेळी विद्यार्थ्यांकरवी करून दाखविण्यात आली.कार्यक्रमाला संचालिका जयश्री सूर्यवंशी,मुख्याध्यापिका अनिता खंडेलवाल, गणेश अहिरे, पांडे ,शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने