जिल्हास्तरीय दिव्यांग क्रिडा स्पर्धेत चोपडा मूकबधिर विद्यालयाचे विद्यार्थ्यांची जोरदार चमक
चोपडा दि.२५(प्रतिनिधी) जळगाव येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय दिव्यांग क्रिडा स्पर्धेत मूकबधिर विद्यालय चोपडा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा जिंकत जिल्हा पातळीवर यश संपादन जोरदार चमक दाखवली आहे.
सामाजिक न्याय विशेष सहाय विभाग मुंबई दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद जळगाव जि. जळगाव आणि दिव्यांग शाळा आणि कार्यशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सावखेडा बुद्रुक जळगाव येथे जिल्हास्तरीय दिव्यांग क्रिया स्पर्धा झाल्या त्यात मूकबधिर विद्यालय चोपडा येथील चार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला त्यामध्ये आठ ते बारा या वयोगटातील 50 मीटर धावण्याच्या मुलींच्या शर्यतीत रिंकू मोहन बारेला तिने द्वितीय क्रमांक पटकाविला तर 12 ते 16 या वयोगटात 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुनिता अरुण बारेला हिने प्रथम क्रमांक पटकावला 12 ते 16 या वयोगटात लांब उडी या मुलींच्या क्रीडा प्रकारात सुनिता अरुण बारेला हिने प्रथम क्रमांक पटकावला विजयी स्पर्धकांचे संस्थेचे अध्यक्ष सौभाग्यवती लीलाताई पाकळे व विद्यमान संचालक सौ. वैशाली हेमंत हरपे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यावेळी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर वृंद उपस्थित होते