तोबा गर्दीत..! मंत्री ना.गुलाबराव पाटील हस्ते धानोरा येथे पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन..
चोपडा, ता. ३१ (प्रतिनिधी): रिक्षा व पानटपरी चालक हे जनतेचेच.. ! म्हणून आमचें सरकार हे घराणेशाहीचे नसून जनतेचेच.. असे सांगत आमच्यावर टीका करण्यासाठी विरोधकांनी काही बुद्धीहीन लोकांना सोडून आम्हाला बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचले जात आहे. आमची नाड जनतेशी जुळलेली असून जनसेवेसाठी आम्ही एकनाथराव शिंदे यांच्यासोबत गेलो असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांच्यावर संधान साधले.
धानोरा ता.चोपडा येथे सोमवारी (ता. ३१) १५.९० कोटी (अक्षरी रक्कम पंधरा कोटी नव्वद लाख रुपये) या पेयजल योजनेचे भूमिपूजन पाणीपुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार प्रा चंद्रकांत अण्णासाहेब सोनवणे, आमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री श्री पाटील म्हणाले, मला पाणीवाला बाबा व्हायचं असून महाराष्ट्रातील जनतेची तहान भागवायची आहे. राजकारण हे फक्त गटार वॉटर व मीटर वर चालते. हे सरकार रिक्षावाले, टपरीवाले सर्वसामान्यांचे सरकार असून आम्ही गद्दार नसून आम्ही शिवसेना मोठी केली व तुम्ही सामान्य कार्यकत्यांच्या जोरावरच मोठे झाले असल्याचा खोचक टोला उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लावला.
माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी आमदारांसहीत विद्यमान मंत्रीनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दिली. गुलाबराव पाटील यांना पुन्हा पाणीपुरवठा मंत्री पद मिळाल्याने चोपडा तालुक्यात १.८८ कोटी रुपयांच्या पेयजल योजनेला मंजुरी मिळवून घेतली. धानोरा येथे मागील काळात पाणीपुरवठा गोड गोड बोलून त्यांना बाटलीत बंद केल्याचे सांगत माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई
गुजराथी यांना टोला लगावला. धानोऱ्यात पेयजल योजनेचे काम येत्या वर्षभरात पूर्ण होणार असून लवकरच २१५ कोटी रुपयांचे१३२ केव्हीचे सबस्टेशनचे काम देखील मार्गी लावण्यासाठी त्यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना विनंती केली. पुढील पंचवार्षिक सांगितले,निवडणुकीत देखील विद्यमान आमदार लता सोनवणे ह्यांचीच उमेदवारी राहणार असल्याचे सुचक वक्तव्य त्यांनी यावेळी केले.
धानोरा येथे आदिवासी तर्फे मा ना. गुलाबरावजी पाटील पालकमंत्री जळगाव जिल्हा यांचा सत्कार करताना संजय शिरसाठ सदस्य संजयगांधी निराधार योजना, प्रताप पावरा सदस्य आदिवासी विकास प्रकल्प यावल, चंद्रशेखर साळुंखे, सौ नायजाबाई पावरा, सौ किर्ती ताई बारेला, सौ समराबाई पावरा, सौ नर्साबाई पावरा, सौ नानीबाई पावरा,, गणदास बारेला, यासु बारेला, देवसिंग पावरा, बिराम बारेला, ईदा बारेला, तितऱ्या बारेला, दिलिप पावरा उपसरपंच, प्रमोद बाविस्कर, संजय बारेला, सुरज बारेला, अनिल पावरा, ताराचंद पाडवी, प्रताप बारेला, आधार बारेला, नामसिंग पावरा, अमाश्या पावरा, खुमसिंग बारेला, मधुकर भिल, गुडा पावरा यांचे सह शेकडो आदिवासी कार्यकर्ते उपस्थित होते.
