त्या दोघे पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली १ दिवसाची पो.कस्टडी
सावदा,दि.०२( प्रतिनिधी दिलीप चांदेलकर.):- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे लाचखोरीच्या प्रकरणात एसीबीच्या जाळ्यात अडकलेल्या सावदा पोलिस स्टेशनचे एपीआय देविदास इंगोले व पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांना आज दि.२ नोव्हेंबर रोजी जळगांव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकाऱ्यांनी भुसावळ येथील जिल्हा न्यायालयात हजर केले असता त्यांना १ दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली.
यावेळी न्यायालयात एपीआय देविदास इंगोले यांना भेटण्यासाठी सावदा व परिसरातील सुज्ञ नागरिकांनी एकच गर्दी केली होती.हे पाहून एपीआय देविदास इंगोले भाऊक झाले.न्यायालय आवारात सदरचे भावनिक दृश्य पाहून प्रथमदर्शनी असे समोर येते की,खरोखर देविदास इंगोले यांनी पोलिस अधिकारी असूनही सर्वसामान्य जनताशी जिव्हाळ्याचे नाते प्रस्थापित करून त्यांना यात यश मिळाले.तरी या प्रकरणी साहेब अडकले या घटनेवर लोकांचा अजिबात विश्वास बसत नाही. याचे बोलके उदाहरण मात्र न्यायालयात दिसून आले.
