" सामर्थ्य " अंकास शैक्षणिक साहित्य पाठवण्याचे आवाहन!
नाशिक दि.२८(प्रतिनिधी): येथील नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्यावतीने, संघटनेचे मुखपत्र असलेल्या सुप्रसिध्द " सामर्थ्य " या पुस्तकाचा विशेष शैक्षणिक विशेषांक प्रकाशित करण्यात येणार आहे. दोनशे पानांच्या या अंकाच्या तीस ते चाळीस हजार प्रती छापण्यात येणार असून, शहर व जिल्ह्यातील असंख्य विद्यार्थी व पालकांना त्या विनामुल्य वितरीत करण्यात येणार आहे. या अंकासाठी, शिक्षणविषयक तज्ञांनी साहित्य पाठवावे असे आवाहन, आज झालेल्या संघटनेच्या सर्वसाधारण सभेत संघटनेच्यावतीने करण्यात आले. याबाबत अधिक माहिती देताना, संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे यांनी सांगितले की, या सामर्थ्य अंकांत, नविन शिक्षणविषयक माहिती असलेले लेख, मोटीवेशनल लेख, करियर मार्गदर्शन, कथा, कविता व चारोळीसारखे दर्जेदार साहित्य छापण्यात येणार आहे. यासाठी समाजातील शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक, संस्थाचालक, उद्योगपती याबरोबरच सामान्य नागरिकांकडून दर्जेदार साहित्य मागविण्यात येत आहे. निवड झालेल्या साहित्यास या अंकात प्रसिद्धी देण्यात येईल. साहित्य पाठविण्यासाठी, जयंत मुळे (९८२३१७१३४२), भास भामरे (९८२२६६२५५३) किंवा रविंद्र पाटील (९१७५८८२११७) या क्रमांकावर संपर्क साधावा अथवा संघटनेच्या कार्यालयात साहित्य आणून द्यावे असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे. या सभेस संघटनेचे उपाध्यक्ष अशोक देशपांडे, मुकुंद रनाळकर, अण्णासाहेब नरुटे, अरुण कुशारे, रविंद्र पाटील, भास भामरे, प्रमोद गुप्ता, लोकेश पारख, सचिन जाधव, किशोर सपकाळे, मितेश छाजेड, गणेश कोतकर, अनिल दवणे, निंबाजी राकडे, दिनेश बच्छाव, प्रतिभा देवरे, माधवी चिंतामणी, निलेश दूसे, अतुल आचळे, वाल्मीक सानप. युवराज जाधव, विलाष निकुंभ, आदी पदाधिकारी उपस्थित होते.