कै. हि मो करोडपती माध्यमिक विद्यालय चोपडा येथे संविधान दिवस साजरा
चोपडा,दि.२६(प्रतिनिधी) येथील कै.हि मो करोडपती माध्यमिक विद्यालयात संविधान दिवस व २६/११ तील मुंबई हल्ल्यातील शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .संविधान दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री डी व्हि बाविस्कर हे होते. सुरुवातीला भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व भारतीय संविधानाचे पूजन करण्यात आले. विद्यालयातील जेष्ठ शिक्षक श्री एम आर भोईटे सर यांनी भारतीय संविधानाचे श्रेष्ठत्व हे स्वातंत्र ,समता व बंधुता यावर आधारित आहे. धर्मनिरपेक्ष व लोकशाही यावर आधारित असलेल्या संघ राज्याची निर्मिती आपल्या संविधानात करण्यात आलेले आहे, यासाठी संविधानाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन प्रत्येक भारतीयांनी करावे असे प्रतिपादन त्यांनी केले. संविधान प्रास्तविकाची शपथ घेण्यात आलीयावेळी ज्येष्ठ शिक्षक श्री आर आर बडगुजर,श्री ए पी बडगुजर, श्रीमती एस टी बोरसे, श्रीमती सी पी बडगुजर,श्रीमती पी सी बडगुजर ,अशोक बडगुजर,सुनील बडगुजर,विलास सनर व विद्यार्थी आणि विद्यार्थीनी यांनी संविधानाचे पूजन केले. शेवटी २६/११ मुंबई येथील हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.