चोपडा येथे प्रताप विद्या मंदिरातील क्रीडा विभागातर्फे विद्यालयात दीपोत्सव साजरा

 चोपडा येथे प्रताप विद्या मंदिरातील क्रीडा विभागातर्फे विद्यालयात दीपोत्सव साजरा 


चोपडा दि.२५( प्रतिनिधी)   दिवाळी सणाच्या निमित्ताने धनत्रयोदशीचे औचित्य साधत प्रताप विद्या मंदिरातील क्रीडा विभागाच्या वतीने मागील वर्षाची परंपरा कायम ठेवत यावर्षी देखील विद्यालयात तब्बल 851 दिवे लावून अनोखा असा दीपोत्सव साजरा करण्यात आला. 

खऱ्या अर्थाने शाळा माय माऊली आपल्या जीवनामध्ये ज्ञानरूपी दिवा लावून प्रकाश रुपी उज्वल यश आपल्या पदरात टाकत असते.याच माय माऊलीच्या क्रीडांगणावर विद्यालयाचे अनेक खेळाडू हे थेट राष्ट्रीय पातळीपर्यंत मजल मारत असतात या गोष्टीची जाणीव ठेवत शाळा हे आपले दुसरे घर म्हणत मैदानावर व शाळेच्या आवारात दिव्यांची रोषणाई करत अनोखा असा दीपोत्सव आजी व माजी खेळाडूंच्या वतीने तसेच विद्यालयाच्या क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आला. याप्रसंगी संस्थेच्या सचिव माधुरीताई मयूर यांनी या कार्यक्रमाचे कौतुक करत खेळाडूंना दिवाळीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा देत पुढील महिन्यातील होणाऱ्या क्रीडा स्पर्धांसाठी देखील उज्वल यश संपादन करण्याच्या व विद्यालयाच्या नावलौकिकाचा इतिहास कायम ठेवण्याचा शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी संस्थेचे समन्वयक गोविंद गुजराथी, विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रशांत गुजराथी, उप मुख्याध्यापक एस.जी.डोंगरे,उपप्राचार्य जे.बी.शेलार,पर्यवेक्षिका माधुरी पाटील,पर्यवेक्षक पी.डी.पाटील तसेच क्रीडा विभागाचे प्रमुख एस.एस.पाटील तसेच अनेक शिक्षक बंधू-भगिनींची उपस्थिती लाभली. कलाशिक्षक पंकज नागपुरे यांनी या सर्व कार्यक्रमाला फोटोग्राफीच्या माध्यमातून अनमोल अशी साथ दिली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे क्रीडा शिक्षक एन.एन.महाजन सर यांनी केले,तर या कार्यक्रमाला विद्यालयाचे माजी खेळाडू चेतन माळी,हर्षवर्धन पवार,प्रथमेश शिंदे,चेतन गाडीलोहार,जय पाटील तसेच विद्यालयातील खेळाडूंचे अनमोल असे सहकार्य लाभले. याप्रसंगी खेळाडूंना क्रीडा विभागाच्या वतीने मिठाई वाटप करण्यात आली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने