प्राचार्य राजेंद्र महाजन यांची चित्रे जगप्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरीत

 प्राचार्य राजेंद्र महाजन यांची चित्रे जगप्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरीत


चोपडा दि.३१(प्रतिनिधी):- येथील भगिनी मंडळ संचलित ललित कला केंद्र या कला संस्थेचे प्राचार्य राजेंद्र महाजन यांची "सृजन" चित्रे दि.१ ते ७ नोव्हेंबर२०२२ दरम्यान जगप्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरीत समूह प्रदर्शनात प्रदर्शित होत आहेत. त्यांची सृजन चित्रे म्हणजे निसर्गाचा भावलेला आविष्कार आहे.त्यांच्या चित्रांची कला प्रदर्शंने जळगाव,धुळे,नासिक,औरंगाबाद, नागपूर,मुंबई,भिलाई,रायपूर,रायगड़,चंदिगड,पातियळा,दिल्ली,कलकत्ता इ.१६ शहरात झालेली आहेत.महाजन यांना राज्य राष्ट्रीय स्तरावर १६पारितोषिके मिळालेली आहेत.त्यांना ललित कला अकादमी नवी दिल्ली या सर्वोच्च संस्थेने आजीवन सभासदत्व बहाल केलेले आहे.या समूह प्रदर्शनात प्राचार्य राजेंद्र महाजन यांच्या सह प्राचार्य बाळासाहेब पाटील (सांगली),प्रा.सौ.वैशाली पाटील (कोल्हापूर),हणमंत लोहार (सांगली),संजय क्षीरसागर (मु़ंबई)यांची चित्रे व आप्पासो.घाडगे(जयसिंगपूर)यांची शिल्पे प्रदर्शित होणार आहेत.या चित्र प्रदर्शंनाचे उद्घाटन दि.१नोव्हें.२०२२ रोजी मुंबादेवी मंदिर ट्रस्टचे ट्रस्टी मिहीर मेहता यांच्या शुभहस्ते होत आहे.या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे कला संचालक प्रो.विश्वनाथ साबळे,व्हेस्को चेंबूर चे प्राचार्य डॉ.आनंद आचारी, आर्किटेक्ट बाॅबी विजयाक्कर, आभाळमाया फौडेशन चे अध्यक्ष आर्किटेक्ट प्रमोद चौगुले(सांगली) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. या चित्र प्रदर्शंनास उद्योगपती विठ्ठलभाई गुजराथी, माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत.हे प्रदर्शन दि.१ते ७नोव्हेंबर २०२२पर्यंत बघता येईल.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने