भारत माता प्रतिष्ठान काळेवाडी आयोजीत नवरात्र उत्सव निमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न
बुलढाणा दि.०३(प्रतिनिधी): काळेवाडी मधील भारत माता प्रतिष्ठान आयोजित श्री दुर्गा माता नवरात्रोत्सवा निमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दि २ सप्टेंबर रोजी भव्य रक्तदान शिबीर घेण्यात आले या शिबीराचे उदघाटन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री नितीन भाऊ बनसोडे यांनी केले.
यावेळी बोलताना श्री नितीन भाऊ बनसोडे यांनी असे सांगितले की सध्या पिंपरी चिंचवड शहरात रक्ताची खुप मोठ्या प्रमाणात चणचण जाणवत आहे आताच आपण कोरोना सारख्या भयानक आजारातून मुक्त झालो आहोत त्यामुळे बरेच लोकांना रक्ताची गरज लागत आहे . रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान असते त्यामुळे नेहमीच रक्तदात्यांना रक्तदान करावे त्यामुळे जास्तीत जास्त व्यक्तींनी व महिलांनी रक्तदान करण्यास पुढे यावे असे आवाहन श्री नितीन भाऊ बनसोडे यांनी केले या शिबिरामध्ये ऐकून 30बॅग रक्त दान झालं.
हनीफ शेख,अक्षय सरवदे, प्रशांत सोनावणे,मोहित पाटील, रीशब पिल्ले,मनोज आरमोगम्म,इरफान पठाण,स्वप्नील पवार, मयुर ठाकूर,सागर सावंत, रगणाते खेडकर,शिवानंद फुलारे व कार्यकर्ते नी रक्त दान केलं.
