आवश्यकता असलेल्या कुटुंबांना सरकारच्या योजना पोहचवा -निरंजन जैन
चोपडा,दि.२९ (प्रतिनिधी)-शिक्षण ही एक सम्पत्ती आहे.ती प्रत्येकाने घेतली पाहिजे. त्यासाठी ज्या कुटंबाला आवश्यकता आहे,अशा कुटंबापर्यंत सरकारच्या शिष्यवृत्ति व इतर योजना पोहचविण्याचे कार्य समाजाने करावे असे प्रतिपादन बीजेएस मायनॉरिटीज नॉलेज सेंटरचे राष्ट्रीय प्रभारी निरंजन जुवा (जैन ) अहमदाबाद यांनी.केले. ते भारतीय जैन संघटना महाराष्ट्र राज्य आयोजित अल्पसंख्याक कार्यशाळेत चोपड़ा तालुकाध्यक्ष निर्मल बोरा यांचे निवास स्थानी बोलत होते.राज्य अध्यक्ष हस्तीमल बंब जालना यांनी प्रास्ताविक केले.मंचवर प्रा.चंद्रकांत डागा,विभागीय सदस्य लतिश जैन उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्र संचालन दीपक राखेचा यांनी केले.
निरंजन जुवा (जैन )यांनी जैन समाजाला अल्पसंख्याक दर्जा मिळाल्याचा लाभ,अधिकार,धार्मिक स्थळांची सुरक्षा,शैक्षणिक संस्थेचा विकास,महिला सक्षमीकरण,गरजवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती,शैक्षणिक कर्ज,आर्थिक दुर्बल घटकांसाठी 10%आरक्षण,उद्योजक व व्यापाऱ्यांसाठी एमएसएई अंतर्गत राज्य व केंद्र सरकारच्या योजना इत्यादि विषयांवर द्रुक श्राव्य माध्यमाने मार्गदर्शन केले.उपस्थित महिलांनी विचारलेल्या प्रश्नांना श्री जुवा यांनी समाधानकारक उत्तरे दिलीत. कार्यक्रम यशस्वीतेसाठी भारतीय जन संघटनेचे सचिव गौरव कोचर कोषाध्यक्ष अभय ब्रम्हेचा,दिनेश लोडाया, दर्शन देशलहरा, जितेंद्र बोथरा, धिरेंद्र डाकलिया, मयूर चोपड़ा श्रेणिक रुणवाल आकाश जैन, आदेश बरडीया,आदींनी मेहनत घेतली