माउंट आबू येथे राष्ट्रीय मीडिया संमेलनास सुरवात ......

 माउंट आबू येथे  राष्ट्रीय मीडिया संमेलनास सुरवात ...........        





                     

माउंट आबू(राजस्थान)ता: ३०:  माउंट आबू(राजस्थान)येथे प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने पाच दिवशीय राष्ट्रीय मीडिया संमेलनास आजपासून शांतीवन येथील कॉन्फरन्स हॉल मध्ये सुरवात झाली.     

 सकारात्मक पत्रकारितेचा समृद्ध भारताकडे प्रवास या विषयावर या संमेलनात चार दिवस मंथन होणार असल्याचे संस्थेच्या मीडिया विभागाचे महाराष्ट्र समन्वयक डॉ सोमनाथ वडनेरे यांनी सकाळ ला सांगितले.   मीडिया क्षेत्रातील मान्यवर या वेळी मत मांडणार असून  संमेलनात भारतातील एक हजाराहून अधिक प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी भाग घेत असून त्यात महाराष्ट्रातील दोनशे प्रतिनिधींचा समावेश आहे.दोन सप्टेंबर रोजी या संमेलनाचा समारोप होईल.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने