आम आदमी पार्टी नासिक तर्फे "भिख मांगो आंदोलन"
नाशिक,दि.२८ (प्रतिनिधी)आज आम आदमी पार्टी नासिक कडून महानगरपालिका रस्ते दुरस्तीसाठी अनोखे "भिक मागो आंदोलन" करण्यात आले, वडाळा रोड या ठिकांनच्या रस्त्यावर हे आंदोलन करण्यात आले, रस्त्यावरुन जाणाऱ्या नागरिकांकडून स्वखुशीने एक रुपया मागण्यात आला, आज दिवसभरातून जे पैसे जमा होणार आहेत त्या पैशाचा गल्ला आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते रस्ते आणि बांधकाम विभागाचे उपायुक्त यांना देणार आहेत.
आज संपूर्ण नाशिक मध्ये रस्त्यांची दुरवस्था झाली आहे, त्या रस्त्यावरून चालताना नागरिकांचे अत्यंत हाल तर होतच आहेत परंतु परिणामतः काही लोकांचा मृत्यू सुद्धा झाला आहे आणि बरेच लोक त्यांच्या दुचाकी वरून घसरून जखमी झाले आहेत, नाशिक मधील मोठमोठ्या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक फोर व्हीलर व टू व्हीलर गाड्यांचे महानगरपालिकेमुळे मेंटेनन्स वाढुन अतोनात नुकसान झालेले आहे, ज्या 14 ठेकेदारांना महानगरपालिकेने रस्त्यांची कामे दिली होती त्यांच्यापैकी एकही ठेकेदाराने आज एकही रस्ता व्यवस्थित केलेला नाही, पुण्यातील जंगली महाराज रस्त्याचे उदाहरण बघता 43 वर्षापासून तो रस्ता आजही जसाचां तसा आहे, एकही खड्डा त्या रस्त्यावर पडलेला नाही, परंतु नाशिक मधल्या ठेकेदारांनी रस्ता बनवण्यानंतर तो चार ते सहा महिन्यातच त्याच्यावर खड्डे पडण्यास सुरुवात होते, विशेष म्हणजे पावसाने या ठेकेदारांची पोलखोल केलेली आहे, यांचे पितळ उघड़े पाड़ल्यामुळे पावसाचे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत,
उत्कृष्ट दर्जाचे काम करण्यासाठी घेण्यात येणारे जनतेचे पैसे काही महानगरपालिका अधिकारी आणि ठेकेदार यांनी आपल्या खिशात घालण्याचे काम केलेले आहे? आज रस्त्याचे बांधकाम झाल्यानंतर महानगरपालिकेच्या विभागाकडून एनओसी दिली जाते, ती एनओसी देण्यामागे असा अर्थ असतो की तो रस्ता चांगला झालेला आहे आणि तो रस्ता भविष्यात कमीत कमी पंधरा वर्षे तरी खराब होणार नाही याची ती गॅरंटी असते परंतु सहा ते सात महिन्यात रस्त्यावर एक एक फूट पडणारे खड्डे बघून आणि त्या अधिकाऱ्यांनी दिलेली एनओसी बघून नाशिक महानगरपालिकेत भ्रष्टाचार किती मोठ्या प्रमाणात फोफ़ावला आहे याचे जिवंत उदाहरण आहे.
आत्ताच नाशिक महानगरपालिकेचे नवीन आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी संबंधित 14 ठेकेदारांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याचे जे आश्वासन दिले आहे ते त्यांनी लवकर पूर्ण करावे अशी आम आदमी पार्टी नासिक मागणी करीत आहेत.
आंदोलन ज्या प्रभागात झाले तो प्रभाग महापौर सतिष कुलकर्णी यांचा असून त्यांनी संबंधित रस्त्याकडे दुर्लक्ष केलेले दिसते किंवा ते या वडाळा रोडवरून जात नसतील असा अंदाज आहे, त्यामुळे त्यांचे त्या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले असेल असे समजूया.
संबंधित प्रभागातील आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते माझीद पठाण आणि प्रभागातील नागरिक यांनी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग घेतला तसेच या आंदोलनात आम आदमी पार्टीचे पदाधिकारी चंदन पवार, स्वप्निल घिया, सादिक अख्तर नागरीकांमधून ड़ॉ. फाहाद शेख, तनवीर पटेल,आसिफ शेख, रिझवान खान, मोसीन खान,महेबुब शेख इत्यादी उपस्थित होते