शिरपूर तालुक्यातील 33 ग्रामपंचायतीचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर
तऱ्हाडी,ता.शिरपुर दि.२१(प्रतिनिधी ज्ञानेश्वर सैंदाणे):- जानेवारी 2021 ते मे 2022 या कालावधीतील मुदत संपलेल्या व जुन 2022 ते सप्टेंबर 2022 या कालावधीतील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या (सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या) सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणक प्रणालीद्वारे प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोग यांचेमार्फत दि जाहीर करण्यात आला असून सदर कार्यक्रमानुसार धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील 33 ग्रामपंचायतीसाठी सदर कार्यक्रम राबविण्यात येणार आहे त्यामध्ये शिरपूर तालुक्यातील आंबे, भोईटी ,बोरपाणी बुडकी,चांदसे- चांदसूर्या ,चिलारे ,दुरबड्या, फतेपुर फॉ, गंधडदेव ,गुऱ्हाळपानी ,हातेड, हेंदऱ्यापाडा, हिगांव ,हिवारखेडा, जलोद- उखलवाडी ,जोयदा ,खैरखुटी, खामखेडा प्रा आंबे, कोलिद, लकड्या हनुमान, लौकी, मालकातर ,मोहिदा, नांदरडे ,न्यू बोराडी ,निमझीरी ,पनाखेड, रोहिणी, सांगवी, सुळे ,वकवाड ,झेंदेणजन, पलासनेर या ग्रामपंचायती येत असून निवडणूक कार्यक्रमात नमूद केलेनुसार 18 ऑगस्ट 2022 रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्धी होईल नामनिर्देशनपत्रे 24 ऑगस्ट 2022 ते 1 सप्टेंबर 2022 या कालावधीत दाखल करण्यात येतील. शासकीय सुट्टीमुळे 27,28 व 31 ऑगस्ट 2022 रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाही.नामनिर्देशनपत्राची छाननी 2 सप्टेंबर 2022 रोजी होईल.नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 6 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 3.00वाजेपर्यंत असेल.मतदान 18 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 7.30ते साय 5.30 या वेळेत होईल.मतमोजणी19 सप्टेंबर 2022 रोजी नवीन प्रशासकीय इमारत तहसिल कार्यालय शिरपूर येथे होईल.अशी माहिती तहसिलदार आबा महाजन व निवासी नायब तहसिलदार अधिकार पेंढारकर यांनी दिली.