आमदार श्री. किशोर आप्पा पाटील यांच्या आमदार निधीतून शहरातील बहीरमनगर भागात दहा लाख किमतीचे सभा मंडप कामाचे भूमिपूजन
पाचोरा दि.२४(प्रतिनिधी राजेंद्र खैरनार,): शहरातील सर्वच भागात रस्तेच रस्ते चे उत्कृष्ट कामें व अंडरग्राऊंड गटारींचे उत्तम प्रकारे कामे,पाचोरा शहराची कार्यसम्राट आमदार श्री.किशोरआप्पा पाटील यांनी पुर्ण कायापालट केलेली आहे सर्व कडे व शहरातील नागरिकांमध्ये शहराच्या विकास कामांचे कौतुक होत आहे,याच पाश्र्वभूमीवर कृष्णापुरी,त्र्यंबकनगर भागालगत च्या "बहिरमनगर" भागात आज दि.२४/७/२०२२ रविवार रोजी मा.नगरसेवक श्री.सतीश आबा चेडे यांच्या अथक प्रयत्नातून बहिरमनगर भागात दहा लाख किंमती चे सभा मंडप मंजुर करुन स्व:ता "पाचोरा-भडगाव चे कार्यसम्राट आमदार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले या शुभ प्रसंगी प्रभाक क्र.३चे मा. नगरसेवक श्री.सतीश आबा चेडे , आदरणीय श्री मुकुंद आण्णा बिल्दीकर जी, सर्व त्यांचे कार्यकर्ते आणि स्थानिक रहिवासी व प्रचंड प्रमाणात नागरिक, महिला उपस्थित होते सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे...