साने गुरुजी आदर्श बालवाडी येथे पालक सभा उत्साहात*

 साने गुरुजी आदर्श बालवाडी येथे पालक सभा उत्साहात


चोपडादि.25-(प्रतिनिधी)शहरातील अमर संस्था संचलित साने गुरुजी आदर्श बालवाडी येथे पालक सभा आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमर संस्थेचे व्यवस्थापक दिवाकर नाथ हे होते तसेच यावेळी मुख्याध्यापिका रेखा नेवे तर पालक प्रतिनिधी म्हणून पोलीस अधिकारी घनश्याम तांबे हे उपस्थित होते. यावेळी आलेल्या पाहुण्याच्या हस्ते दीप्रज्वलनाने आणि सरस्वती पूजनाने पालक सभेची सुरवात झाली .

यावेळी मुख्याध्यापिका रेखा नेवे यांनी पालकांशी संवाद साधला त्या म्हणाल्या अमर संस्था हि एक शहरातील नामवंत सामाजिक व शैक्षणिक संस्था आहे . संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मार्गद्शनाखाली या संस्थेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या साने गुरुजी आदर्श बालवाडीत लहान मुलांचा सर्वांगीण विकास साधण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील असतो.समाजातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.तसेच पालकांनी वेळ काढून मुलाशी घरी संवाद साधला पाहिजे.आज वर्गात काय घडले त्याची विचारपूस केली पाहिजे.विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दूर ठेवावे  म्हणून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे  शिक्षकांसमवेत आपणही लक्ष द्यावे असे सांगितले.

सभेसाठी राकेश राजपूत, अशोक पावरा, रमेश कोळी ,भूषण महाजन ,गौरव पाटील जगदीश धनगर,जावेद शेख ,पितांबर पाटील आदी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुरेश्वर सोनवणे यांनी तर आभार अर्चना चौधरी यांनी मानले...

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने