राजेंद्र विद्यालय भोयगाव येथे शालेय मंत्रिमंडळ स्थापन
चंद्रपूर दि.३० (प्रतिनिधी प्रथमेश तेलंग) दि. 29/07/2022 ला लोकशाही मार्गाने निवडणूक घेण्यात आली. उमेदवारांना चिन्ह देण्यात आले. तसेच नोटा चिन्हाचा वापर करण्यात आला. निवडणूक प्रक्रियेची प्रत्यक्ष अनुभूती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
शालेय मंत्रिमंडळ पुढील प्रमाणे निवडण्यात आले.मुख्यमंत्री - रोहित रमेश गोहणे वर्ग 10 वा
क्रीडा मंत्री - कु. मानसी राजेंद्र वरारकर वर्ग 9 वा
सांस्कृतिक मंत्री - तुषार गजानन गोहणे वर्ग 10 वा आरोग्य व पर्यावरण मंत्री - कु. श्रुतिका संजय पारखी वर्ग 9 वा
अन्न व पाणी पुरवठा मंत्री - कु. नुतन राजू चौधरी वर्ग 8 वा
विद्यार्थिनी प्रतिनिधी -
कु. प्रतिक्षा गोकुलदास नवले वर्ग 10 वा
मा. मुख्याध्यापक व्ही. एस. चटप यांचे मार्गदर्शाखाली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जी. एम. लांडे यांनी काम केले. सहाय्यक मतदान अधिकारी म्हणून बी. झेड. निखाडे, डी. डी. ठाकरे, कु. व्हि. टी. वैद्य व कु. एस. एन. गाडगे यांनी चोख कामगिरी पार पाडली. त्यांना डी. आर. चिने यांनी मदत केली.
अशाप्रकारे लोकशाही मार्गाने निवडणूक घेण्यात येवून शालेय मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली.