पंकज प्राथ.विद्यालयात पहिली केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न...*



*पंकज प्राथ.विद्यालयात पहिली केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न...*

   चोपडादि.३० (प्रतिनिधी ):---

        येथील पंकज प्राथमिक विद्यालयात या शैक्षणिक वर्षातील पहिली शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली. निमगव्हाण व चोपडा शहर केंद्राचे केंद्रप्रमुख दिपक पाटील हे केंद्रस्तरीय शिक्षण परिषदच्या अध्यक्षस्थानी होते. तर शिक्षण परिषदेला व्यासपीठावर पंकज प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एम व्ही पाटील ,सर्व शाळांचे मुख्याध्यापक , सुलभक समाधान बाविस्कर , योगेश चौधरी आदी उपस्थित होते. सर्वप्रथम ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन  या वर्षातील पहील्या केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचा प्रारंभ करण्यात आला. 

     यावेळी पहीली ते आठवीतील सर्व विद्यार्थ्यांनी पायाभूत शिक्षण व मुलभूत क्षमता प्राप्त करणे यासाठी सर्व शाळेतील सहशिक्षिका, शिक्षकांनी नियोजनानुसार अध्यापन करावे, तसेच विद्याप्रवेश व सेतू अभ्यासक्रम या विविध उपक्रमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असे केंद्रप्रमुख दिपक पाटील यांनी उपस्थित शिक्षकांना सूचना केल्या. तसेच अनेक प्रशासकीय विषय स्पष्ट केले .

        जीवन कौशल्य स्व ची जाणिव या विषयावर योगेश चौधरी यांनी मार्गदर्शन केले. चला तंत्रस्नेही होऊ या या विषयावर समाधान बाविस्कर यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रीय निपुण भारत अभियानानुसार पायाभूत / गणितीय साक्षरता या विषयाच्या चर्चेत सर्व शाळांनी सहभाग घेतला.

 सदरील शिक्षण परिषद यशस्वी करण्यासाठी दिलीप बाविस्कर, रवि शार्दूल, कैलास बोरसे, प्रमोद पाटील, संदीप पाटील यांनी परिश्रम घेतले. शिक्षण परिषदेचे सूत्रसंचलन व आभार आर डी पाटील यांनी मानले...

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने