रानभाज्या,खेकडे,चिंबोरी खरेदीला खवय्यांची झुबड

 रानभाज्या,खेकडे,चिंबोरी खरेदीला खवय्यांची झुबड



मुंबई दि.३०प्रतिनिधी शांताराम गुडेकर )पावसाळा सुरू झाला की रानभाज्या बाजारात येण्यास सुरूवात होते. जंगलातून आणलेल्या या रानभाज्या औषधी असल्याने ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडते. या भाज्यांबरोबरच चिंबोरी, खेकडेही बाजारात विकायला येतात. रानभाज्या आणि खेकडे या दिवसांमध्ये कमी किमतीत उपलब्ध होतात. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक आवर्जुन त्यांची खरेदी करतात.रानभाज्या आणि खेकडे,चिंबोरी बाजारात मोठ्या प्रमाणावर आल्या आहेत.त्यामुळे खवय्यांची  तेथे खरेदीसाठी झुंबड दिसते.जंगली भाज्या औषधीसुद्धा असतात. तसेच पावसाळ्यापुर्वी इतर भाजीपाला महागलेला असतो. त्यामुळे ग्रामीण भागातील लोक या रानभाज्यांना पसंती देतात. वाडा शहरातील बाजारपेठेत मोखाडा येथील सुर्यमाल, जव्हार, विक्रमगड आणि वाडा या डोंगराळ भागातील लोक शेवळी, लोत, कोळीभाजी, बाफली, दिंडे या सारख्या रानभाज्या व खेकडे बाजारात विकायला आणतात. एक जुडी २० ते २५ रूपयांत अशी रानभाजी विकली जाते. तर नदीचे खेकडे प्रती नग ५० ते ६० रुपयांना तर जंगलातील खेकडे २५ ते ३० रुपयांना विकले जातात.त्यामुळे आदिवाशी बांधवांना सुगीचे दिवस आले आहेत.आपल्या मुलांना शैक्षणिक साहित्याची खरेदी करता यावी यासाठीच  या आदिवाशी बांधवांची रानभाज्या,खेकडे,चिंबोरी शोधून विकण्याची धडपड  असते.


"पावसाळा सुरु होताच खेकडे,रानभाज्या,चिंबोरी व मासे पकडून आम्ही  विकत असतो,त्यामुळे आमच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च सुटतो.दोन पैसे जास्त हाती मिळत असल्याने आम्ही ते जमा करुन इतर सुखसोयी मिळविण्यासाठी प्रयत्न करतो.

हंसाबाई तवटे

विक्रेती-विक्रोळी पार्क साईट

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने