फुले नगरातील तेरा वर्षीय बालक बेपत्ता.. कोणाला आढळून* *आल्यास माहिती कळवा :पोउनि जी.सी. तांबे*

 


*फुले नगरातील तेरा वर्षीय बालक बेपत्ता.. कोणाला आढळून* *आल्यास माहिती कळवा :पोउनि जी.सी. तांबे* 


चोपडा दि.२६(प्रतिनिधी): शहरातील फुले नगरातील तेरा वर्षीय बालक रुपेश ऊर्फ सुऱ्या अमृत माळी यास अज्ञात व्यक्तीने फुस लाऊन पळवून नेल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून आईच्या  तक्रारींवर पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे तरी बालक कोणास दिसल्यास पोलीसात कळवा असे आवाहन पोलिस उपनिरीक्षक जी.सी.तांबे यांनी केले आहे.

फिर्यादी कल्पना अमृत माळी वय-38 वर्ष धंदा मजुरी रा. फुलेनगर चोपडा ता. चोपडा जि. जळगांव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गु.र.न. व कलमभाग 5 गुरनं. 257/2022 भादवि कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी ची फिर्यादी अशी की,अज्ञात व्यक्तीने दिनाक 16/06/2022 रोजी सायं. 18.00 वा.चे सुमारास फुले नगर चोपडा येथुन फिर्यादी यांचेराहते घरासमोरुन अज्ञात आरोपी  याने फिर्यादी यांचा मुलगा नामे रुपेश उर्फ भु-या अमृत माळी वय 13 वर्ष 07 महीने 08 दिवस यास काहीतरी फुस लावुन पळवून नेले .

रुपेश उर्फ भु-या अमृत माळी वय 13 वर्षे 07 महीने 08 दिवस, रंगाने सावळा, ऊंची सुमारे 04 फुट 05 इंच, शरीराने सडपातळ, चेहरा लांबट, नाक सरळ, डोळे काळे साधारण, ओठ बारीक, डोक्यावर काळे मागे वळलेले केस, उजव्या हाताच्या मनगटावर ओम गोंदलेले, उजव्या हातात लोखंडी स्टीलचे कडे, अंगात गुलाबी रंगाचा ठिपक्यांचा फुल बाह्याचा शर्ट व कमरेस पोपटी रंगाची नाईट पँट असे वर्णन आहे. येणे प्रमाणे वर्णनाचा पिडीत मलगा कोणाला आढळून आल्यास चोपडा शहर पोलीस स्टेशन पो स्टे फोन क्र. ०२५८६ / २२०३३३ /७७७४०३९६४० या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पोलिस उपनिरीक्षक घन:शाम तांबे यांनी केले आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने