*भाजपा पदधिकारी व कार्यकर्ते यांनी रावेर येथे केला आंनद उत्सव*
रावेर दि.३०(प्रतिनीधी ईश्वर महाजन ) दि. 29 जुन आज रावेर येथे भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच नागरिक यांनी राज्यात गेल्या 31 महीन्या पासुन असलेले अनैसर्गिक महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष मा. जे. पी. नड्डा, देशाचे गृहमंत्री अमित शहा,यांचे आशीर्वादाने व मा. देवेंद्रजी फडणवीस यांचे मार्गदर्शनाखाली आज सायंकाळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदी मा. एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री पदी मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी शपथ घेताच रावेर येथे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पदमाकरभाऊ महाजन यांचे नेतृत्वाखाली येथिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष करण्यात आला यावेळी भाजपा शहराध्यक्ष दिलीप पाटील, माजी नगरसेवक यशवंत दलाल, माजी नगरसेवक अरुण शिंदे, मनोज श्रावक, भैय्या चौधरी, उमेश महाजन, धोंडू पासे, रजनीकांत बारी, ई. जे. महाजन सर, पवन चौधरी, रवी पाटील, गणेश मराठे आदी उपस्थित होते