वादळी वाऱ्याने तुटलेल्या वीज तारांचा शॉक लागून महिलेचा मृत्यू
जामनेर दि.१९( प्रतिनिधी करण साळुंखे) शहरातील शिवाजी नगरातील रहिवासी महिलेचा वीजेच्या तारांना स्पर्श होऊन जागीच मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली.
शहरातील साईकृपा प्लायवूडचे संचालक ,विलास नारायण चांदेकर यांच्या मातोश्री ,सौ मिराबाई नारायण चांदेकर
ह्यांना रात्रीचा पाऊस वादळामुळे एम एस सेबीचे तुटून पडलेल्या तारांचा स्पर्श होऊन शॉक लागून जागीच मृत्यू झाला ही सकाळी दहाच्या दरम्यान घडली ,नारायण दादा चांदेकर यांच्या घरी दुःखाचा डोंगर कोसळला, आणि तिथे समस्त सुतार जनजागृती सेवा संस्थाचे अधिकृत कार्यकर्ते व भाविक हे सगळेच उपस्थित होते.