चोपडा नागलवाडी रस्त्यावर लाखोचा गुटखा जप्त; चोपडा शहर पोलीसांची कारवाई....*

 

चोपडा नागलवाडी रस्त्यावर लाखोचा गुटखा जप्त; चोपडा शहर पोलीसांची कारवाई....* 



चोपडा दि.११(प्रतिनिधी ):--तालुक्यातील नागलवाडी रोडवर रात्री बेकायदेशीररीत्या सुगंधित पानमसाला व गुटख्याची वाहतूक करणारे वाहन पकडले असून सुमारे २५ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

 *पिकअप व्हॅनमध्ये होत होती वाहतूक* 

याबाबत अधिक माहिती अशी की, चोपडा ते , नागलवाडी रोडवर असलेल्या शिवमंदिरात जवळून एक बेकायदेशीररित्या सुगंधित पानमसाला व गुटखाची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी मिळाली. त्यानुसार पोलिसांनी नागलवाडी रोडवर सायंकाळी ८ वाजता कारवाई करत वाहन क्रमांक (एमएच २० सिटी ६९६४) या वाहनांची तपासणी केली असता व्हॅनमध्ये २० लाख ४० हजार ४०० रुपये किमतीचा सुगंधित पानमसाला तंबाखू आणि गुटखा असा मुद्देमाल आढळून आला. याप्रकरणी संशयित आरोपी चंद्रकांत लक्ष्मण हटकर (वय-३५) रा. तांबापुरा आणि अजय अरुण पाटील रा. चोपडा असे नावे समोर आले आहे. याप्रकरणी पोलीस नाईक हेमंत कोळी यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी चंद्रकांत लक्ष्मण हटकर आणि अजय अरुण पाटील यांच्या विरोधात चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण करीत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने