चोपडा पं.स.चे माजी उपसभापती सूर्यकांत खैरनार यांच्यावर भ्रष्टाचाराचा लेखी आरोप .. डॉ.चंद्रकांत बारेला यांच्याकडे मांडले वरगव्हाण गावकऱ्यांनी गाऱ्हाणे
चोपडा दि.१०( प्रतिनिधी ) चोपडा तालुका हा गत काही दिवसांपासून काही न काही कारणास्तव गाजत आहे,कालच वर्डी येथील ग्राम विकास अधिकारी भगवान पांडुरंग यहीदे या लाचखोर अधिकाऱ्यास ट्रॅप करून जेरबंद केले.ही घटना ताजी असतांनाच आज पुन्हा मन हेलावणारे प्रकरण पुढे आले
आहे.चोपडा पंचायत समिती चे माजी उपसभापती सूर्यकांत खैरनार यांनी आदिवासी बांधवांकडून शबरी घरकुल योजना मिळवून देतो म्हणत लाखो रुपये खिशात घालत घोटाळा केल्याचे लेखी निवेदनच साक्षात वरगव्हाण येथील लुबाडणूक झालेल्या लोकांनी आदिवासी प्रकल्प समितीचे अध्यक्ष डॉ.चंद्रकांत बारेला यांना दिले आहे.
याबाबत सविस्तर असे की,डॉ.चंद्रकांत बारेला यांनी आदिवासी प्रकल्प समितीचे अध्यक्षपद सांभाळल्या पासून गोर,गरीब,आदिवासी जन हिताचे काम पारदर्शी पद्धतीने सुरू केले आहे.।त्यामुळे पाड्यावरील माणूस जागृत झाला आहे
अन्याय सहन न करता न्यायासाठी लढावे ही संस्कृती तयार होत आहे,याचे उदाहरण म्हणून आज दि.९ रोजी दुपारी वरगव्हाण ता.चोपडा येथील नागरिकांनी डॉ.बारेला यांची भेट घेत त्यांच्याच परिसरात व मतदारसंघातुन निवडून आलेले माजी उपसभापती सुर्यकांत खैरनार यांच्या विषयी लेखी तक्रारी निवेदन दिले आहे
त्यात म्हटले आहे की,आम्ही खालील सह्या करणार सर्व नागरिक लिहून देतो की,मे २०२१
या काळात सदर सूर्यकांत खैरनार यांनी आमच्याशी संपर्क साधून मी व गटविकास अधिकारी आम्ही तुमचे शबरी घरकूलचे काम लगेच करून देऊ,तुमचे प्रकरण पास करू.त्या मोबदल्यात प्रत्येकी ६ हजार रुपये असे एकूण ३५ लाभार्थीकडून जमा केले.असे एकूण २ लाख दहा हजार रुपये आमच्याकडून वसूल केलेत. आजपावेतो आम्हाला कुठलाही घरकुल अथवा कोणताही लाभ मिळाला नसून आमची फसवणूक झालेली आहे तरी संबधीत भ्रष्ट्राचार करणाऱ्या लोकप्रतिनिधीवर योग्य ती कारवाई होणेस निवेदन