थकीत वेतनासाठी ग्रामपंचायत कर्मचारी एक जून पासून काम बंद आंदोलन करणार




थकीत वेतनासाठी ग्रामपंचायत कर्मचारी  १ जून पासून काम बंद आंदोलनाचा इशारा


चोपडा ,दि.३०(प्रतिनिधी): थकीत वेतनासाठी ग्रामपंचायत कर्मचारी  एक जून पासून काम बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा   ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे राज्य सचिव अमृतराव महाजन जिल्हाध्यक्ष संतोष खरे यांनी दिला आहे

 महाराष्ट्र सरकार तर्फे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना 50% ते 100% पगाराचे अनुदान दरमहा मिळते ते मार्च 2022 पासून मिळालेले नाही. दुसरीकडे ग्रामपंचायती कर्मचाऱ्यांना त्यांच्याकडील वेतनाचा हिस्सा व राहणीमान भत्ता देतच नाही प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम भरतच नाहीत त्यामुळे कर्मचाऱ्यांची उपासमार होत असून पगार संबंधित ग्राम पंचायत कर्मचारी महासंघाकडे वारंवार विचारणा करीत असतात. त्याचप्रमाणे मार्च 2021ते मार्च2022  काळातील फंडाचा हिशोब रक्कमा कर्मचाऱ्यांचे खाती पडलेल्या नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक नुकसानही होत आहे. महाराष्ट्र शासनाने 10 ऑगस्ट 2020 पासून जाहीर केलेली पगारवाढ तिच्यासाठी सुद्धा केलेली नाही. ज्या कर्मचाऱ्यांनी covid-19काळात जीव धोक्यात घालून अर्धवट पगारावर काम केले अशा कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र सरकार व ग्रामपंचायती पगारासाठी तरसवत आहेत ही बाब स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या महाराष्ट्र सरकारला त्याच बरोबर जळगाव जिल्हा परिषदे ला लाजिरवाणी आहे. असे आम्हाला वाटते त्यामुळे महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांमध्ये फार मोठा असंतोष असून कर्मचाऱ्यांना सनदशीर मार्गाने संघर्ष करण्याशिवाय पर्याय नाही. म्हणून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना 31 मे 2022 पर्यंत पगार न मिळाल्यास एक जून2022 पासून ग्रामपंचायत कर्मचारी काम बंद आंदोलन पुकारतील ग्रामपंचायतीच्या कामांवर बहिष्कार टाकतील असा  ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे राज्य सचिव अमृतराव महाजन जिल्हाध्यक्ष संतोष खरे यांनी दिला आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने