चापरने वार करून दगडाने ठेचले.. प्रेम संबंधाने "अनिकेत"च्या जीवावर बेतले..!
जळगाव (प्रतिनिधी):शहरातील पिंप्राळा रेल्वेेगेट जवळील मालधक्क्यावर तरुणावर चॉपरने वार करुन त्याच्या डोक्यात दगड टाकून त्याचा निर्घृण खून केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री 1.30 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे जळगाव शहरात खळबळ उडाली आहे. आनंद उर्फ अनिकेत गणेश गायकवाड (वय-21, रा. राजमालतीनगर) असे मयत तरुणाचे नाव असून याप्रकरणी शहर पोलिसात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, अनिकेतच्या कुटुंबियांनी त्याच्या कपडयावरुन त्याची ओळख पटविल्यानंतर पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केला. याप्रकरणी शहर पोलिसात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संशयित सागर बाळू सामुद्रे (वय- 19, रा. राजमालती नगर) व सुमित संजय शेजवळ (वय- 18, रा. पिंप्राळा हुडको) या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्रीच अटक केली.