डोंबिवली मध्ये होणार विशेष प्रबोधन महासंमेलनाचे आयोजन.. छत्रपती संभाजी राजेंच्या जयंती निमित्त पत्रकार परिषदेत खुलासा

 

 


डोंबिवली मध्ये होणार विशेष प्रबोधन महासंमेलनाचे आयोजन.. छत्रपती संभाजी राजेंच्या जयंती निमित्त पत्रकार परिषदेत खुलासा

कल्याण दि.२१(प्रतिनिधी): छञपती क्रांति सेना ची पत्रकार परिषद  काल कल्याणच्या शासकीय विश्राम गृह येथे संपन्न झाली.शिवशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी छत्रपति संभाजी राजेंच्या मावळ्यांनी एकत्र येणे काळाची गरज आहे.म्हणून विशेष प्रबोधन महासंमेलाचे आयोजन  डोंबिवली येथे करण्यात आले आहे अशी माहिती छत्रपति क्रांती सेनेचे प्रवक्ते मिथुन पाटील यांनी काल  पत्रकार परिषदेत  सांगितले.

छत्रपति संभाजी महाराज स्मारक परिषद व छत्रपति क्रांती सेनेच्या संयुक्त विद्यमाने २१ मे २०२२ रोजी  डोंबिवली येथे छत्रपति संभाजी महाराज जन्मोत्सव पार पडणार आहे.

यावेळी  संभाजी राजेंची शहरभर भव्य मिरवणूक काढन्यात येणारं असून शेवटी नांदीवली रोड, डी एन सी हायस्कूल येथे समारोपीय प्रबोधन संमेलन पार पडणार आहेअशी माहिती ही पत्रकार परिषदेत देण्यात आली.

या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रीसर्ष अँड सेंटर चे डायरेक्टर व भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय महासचिव प्राध्यापक विलास खरात असणार आहे.

यासह बहुजन क्रांती मोर्चा, द बुद्धीस्ट इंटरनॅशनल नेटवर्क,भारतीय विद्यार्थी मोर्चा, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ बिग्रेड, मराठा सेवा संघ या सह बहुजन मुक्ति पार्टी, आदी सामाजिक राजकीय मंडळीचे वाक्तागण लाभणार आहेत.

त्यामुळे सर्व अठरा पगड जातींच्या लोकांना अवाहन करण्यात आले आहे की,  खरा इतिहास  जाणुन घेण्यासाठी मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने