*ऑलंपियाड परीक्षेत पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलचे घवघवीत यश...*
चोपडादि.०६ ( प्रतिनिधी) :--- चोपडा येथील पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखत ऑलंपियाड परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. यात इयत्ता दुसरीतील *नक्षत्रा अमोलसिंग राजपूत* या विद्यार्थीनीने मॅथ ऑलंपियाड परीक्षेत आंतरराष्ट्रीय रँक २ व ९३.४३ टक्के गुण प्राप्त करून यश संपादन केले आहे. तसेच सुवर्णपदक व प्रशस्तीपत्र मिळाले आहे. इयत्ता दुसरीतील विद्यार्थिनी *वेदिका मिलिंद पाटील* या विद्यार्थिनीला मॅथ ऑलंपियाड मध्ये ८६.८७ टक्के तसेच सायन्स या विषयात ७३.७९ टक्के तर इंग्रजी या विषयात ७०.२१ टक्के गुण प्राप्त केले आहेत. तिला सुवर्ण पदक व प्रशस्तीपत्र मिळाले आहे. तसेच दुसरी पातळीसाठी ती पात्र ठरली आहे. त्याच प्रमाणे
इयत्ता दुसरीतील विद्यार्थिनी *जिज्ञासा विशाल जाधव* या विद्यार्थिनीला ८९.९ टक्के मिळाले असून तिला रौप्य पदक मिळाले आहे तर इयत्ता दुसरीतील विद्यार्थी *श्रीत पंकज पाटील* या विद्यार्थ्याने गणीत या विषयात ८७.३८ टक्के प्राप्त करून कास्य पदक मिळविले आहे.तसेच इयत्ता
सहावीतील विद्यार्थिनी *हर्षाली संदीप सोनवणे* या विद्यार्थिनीला ७५.७६ टक्के गुण व तिला सुवर्ण पदक मिळाले आहे .
*श्रेया यतीन पाटील* या विद्यार्थिनीला ७३.७४ टक्के गुणप्राप्त झाले असून तिला रौप्य पदक मिळाले आहे.
तर *सिद्धी गंगाधर पाटील* या विद्यार्थिनींला ७१.७२ टक्के व कास्य पदक मिळाले आहे. तसेच इयत्ता नववीतील *धनश्री योगेश सनेर* या विद्यार्थिनीने आयक्यू या विषयात ७९.८० टक्के गुण व सुवर्ण पदक मिळाले आहे. तर इयत्ता दहावीतील *सात्विक दीक्षित* या विद्यार्थ्यास ७१.७२ टक्के गुण प्राप्त करून त्याला सुवर्ण पदक मिळाले आहे. इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी *वंशिका अग्रवाल या* विद्यार्थिनीला ७१.७२ टक्के व सुवर्णपदक मिळाले आहे.
या यशाने शाळेचे नावलौकिक केले आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांना
पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डाॅ. सुरेश बोरोले यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या कार्यक्रमास संस्थेचे संचालक तथा रोटरी क्लब अध्यक्ष पंकज बोरोले ,संस्थेचे उपाध्यक्ष अविनाशजी राणे तसेच पंकज प्राथमिकचे मुख्याध्यापक एम. व्ही. पाटील ,माध्यमिकचे विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही .आर. पाटील, पंकज कला व शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य महादेव वाघमोडे , पंकज इंग्लिश मीडियम चे प्राचार्य संदीप वन्नेरे, पंकज ग्लोबल चे प्राचार्य मिलिंद पाटील, वस्तीगृह प्रमुख के .पी. पाटील, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
सदर कार्यक्रम शाळेच्या प्रांगणात घेण्यात आला.
यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य मिलिंद पाटील, समन्वयक किरण चौधरी, के .के. शुक्ला,चंद्रकांत पाटील(ऑलंपियाड इन्चार्ज), इब्राहिम तडवी, महेंद्र पानपाटील, मुकेश पाटील, सौ.शुभांगी पाटील , सौ. स्वाती पाटील,उपमा जैस्वाल, सौ. हर्षिता चौधरी, सौ. प्रीती पाटील आदी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.