.अखेर भारनियमनाला कंटाळून अधिकाऱ्यांना दिले "बेशरम"चे झाड..भाजपा युवा मोर्चा विद्यार्थी आघाडीच्या अनोख्या आंदोलनाने विज मंडळ झाले पाणी पाणी



..अखेर भारनियमनाला कंटाळून अधिकाऱ्यांना दिले "बेशरम"चे झाड..
भाजपा युवा मोर्चा विद्यार्थी आघाडीच्या अनोख्या आंदोलनाने विज मंडळ झाले पाणी पाणी

          शिंदखेडा दि.२६(प्रतिनिधी):   विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना बेशरम चे झाड देऊन निषेध आंदोलन करून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा विद्यार्थी आघाडीच्या वतीने विद्युत भारनियमन बंद करण्यात यावे यासाठी निवेदन दिले.गेल्या काही दिवसांपासून शिंदखेडा शहर तसेच परिसरात विद्युत भारनियमन करण्यात येत आहे.सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने तापमानाने उच्चांक गाठला आहे.गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे.लोक उन्हामुळे त्रस्त आहेत.वाढत्या तापमानामुळे उष्माघात कक्षातील रूग्णांना विजेअभावी जिवीतास धोका निर्माण झाला आहे.तसेच विवाह कार्य मोठ्या प्रमाणात सुरू असुन त्यात विजेअभावी व्यत्यय येत असल्या कारणाने विवाहाचे आयोजक त्रस्त आहेत.त्यांना विजेअभावी बऱ्याचशा समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.तसेच उन्हाळी सुट्टी सुरु असुन बरेचसे विद्यार्थी संगणकाचे कोर्सेस करत असुन तसेच ऑनलाईन कोर्सेस सुध्दा सुरू असल्याने त्यांना विजेअभावी संगणकीय शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे.तरी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व नागरिकांच्या नुकसानीचा विचार करून होणारे भारनियमन त्वरित थांबवावे अन्यथा विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी तिव्र आंदोलन करण्यात येईल व होणाऱ्या परिणामास विज वितरण प्रशासन जबाबदार राहिल असा इशारा देण्यात आला आला.यावेळी माजी नगरसेवक तथा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष सुरज देसले, विनोद माळी,अजय भिल,अक्षय वाणी, नितीन गुरव,राकेश भिल,महेश गुरव,परेश शिंपी आदी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने