चांदवड तालुका पोल्ट्री फार्म संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी दीपक झाल्टे यांची निवड
चांदवडदि.०५(प्रतिनिधी ):तालुका पोल्ट्री संघटनेच्या तालुका अध्यक्ष पदी श्री दिपक भाऊ झालटे यांची बिनविरोध निवड , करण्यात आली आहे.
आज बुधवार दि ४/५/२०२२ रोजी चांदवड तालुका पोल्ट्री संघटनेची बैठक जिल्हाध्यक्ष श्री रोहिदास गायकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यामध्ये पोल्ट्री संदर्भात फार्मर यांना होणारा त्रास आणि कंपनी द्वारे होणारी पिळवणूक यासंदर्भात चर्चा करण्यात आली.आता येणाऱ्या काळात पोल्ट्री संघटना प्रत्येक खेडोपाडी असलेल्या पोल्ट्री फार्मर पर्यंत पोहचून त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आक्रमक झालेली दिसेल व चांदवड तालुक्यातील सर्व पोल्ट्री फार्मर यांना न्याय मिळवून द्यायचं काम संघटना पूर्ण ताकदीने करेल असा विश्वास नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष दिपक भाऊ झालटे यांनी व्यक्त केला.. तसेच बाकी कार्यकारिणी ही जाहीर केली उर्वरीत पदे पुढीलप्रमाणे उपाध्यक्ष पदी-सचिन क्षत्रीय, कार्याध्यक्ष पदी-शिवनाथ विसपुते, सचिव-संतोष कुशारे, संघटक पदी-माणिक शिंदे, खजिनदार पदी -हेमंत पानसरे,प्रसिद्धी प्रमुख पदी-विकास गोजरे,कायदेशीर सल्लागार-राजेश गांगुर्डे,आणि परशराम शिंदे,संजय भवर,अंबादास ढगे,विकास ठाकरे,दिगंबर गांगुर्डे आदी सदस्य उपस्थित होते..