कामगार वर्गाचा यथोचित गौरवाने हमाल वर्गोचे आनंदाश्रू तरळले..जळगावच्या रेल्वे माल धक्का कामगार संघटनेचे अध्यक्ष श्री.मुकेश ऊर्फ आबाभाऊ रमेश बाविस्कर यांच्या अनोख्या उपक्रमाने १ "मे" सार्थकी*

 






*कामगार वर्गाचा यथोचित गौरवाने  हमाल वर्गोचे आनंदाश्रू तरळले..जळगावच्या रेल्वे माल धक्का कामगार संघटनेचे अध्यक्ष श्री.मुकेश ऊर्फ आबाभाऊ रमेश बाविस्कर यांच्या अनोख्या उपक्रमाने १ "मे" सार्थकी*

जळगाव दि.०१(प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्यात १ में हा कामगार दिन म्हणून पाळला जातो .मात्र खऱ्या अर्थानं बिचाऱ्या वर्षानू वर्षे घाम गाळून पोट भरणाऱ्या या वर्गाचा ना कुठे पुरस्कार ना  शाबासकी ची थाप..मिळते ती फक्त आर्डर ..! हे काम कर..ते काम पूर्ण झाले काय?या शब्दाची वाखोली..!मात्र जळगावच्या रेल्वे माल धक्का कामगार संघटनेचे अध्यक्ष श्री.मुकेश ऊर्फ आबाभाऊ रमेश बाविस्कर यांनी कामगारांची व्यथा लक्षात घेऊन भगवा रुमाल, पुष्प गुच्छ श्रीफळ देऊन मानाने सत्कार सोहळा करुन मिठ्ठान्न भोजन देऊन मायेची ऊब  दिल्याने अनेकांच्या आनंदाश्रू तराळले..या आगळ्यावेगळ्या सोहळयाने खरोखरच कामगार दिन साजरा  झाल्याचे सार्थकी लागल्याचे कामगारांनी व्यक्त करत आयोजकांना धन्यवाद दिलेत.

आज दि,01/05/22, *एक में कामगार* दिवस निमित्ताने जळगांव रेल्वे मालधक्का कामगार संघटना चे
*अध्यक्ष श्री,मुकेश(आबा) रमेश बाविस्कर*
यांच्या वतीने सर्व हमाल बंधू यांना *भगवा रुमाल पुष्पगुच्छ व श्रीफळ* देऊन सन्मानित करण्यात आले व *500 ते 700* हमाल बंधू यांना जेवण देण्याचे *अप्रतिम कार्य अध्यक्ष* यांनी केले यावेळी उपस्थित जळगाव शहराचे *मा,उपमहापौर डॉ, अश्विन भाऊ सोनवणे*
*नगरसेवक श्री, किशोर रमेश बाविस्कर*
*समाजसेवक श्री, राहुल भाऊ सोनवणे*
*ॲड,श्री,अमित भाऊ सोनवणे*
*श्री,बंटी भाऊ गवळी,श्री,विनोद भाऊ कोळी, श्री,सोनी सोनवणे, श्री,संदीप भाऊ पाटील, कैलास जाधव, भैया भाऊ शंकपाळ, सुरज भाऊ सोनवणे, श्री,बाळू बाविस्कर,विक्की मुंदडा, भैय्या सोनवणे,*
या सर्वांच्या वतिने सर्व हमाल माथाडी *कामगार,बंधु यांचा सत्कार करण्यात आला* यावेळी या *संघटनेचे, अध्यक्ष,* *उपाध्यक्ष, सचिव, व सदस्य*, कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित   होता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने