अडावद आरोग्य उपकेंद्रात जागतीक डेंग्यू दिवस साजरा
चोपडा दि.१८(प्रतिनिधी): तालुक्यातील अडावद आरोग्य केंद्रात किटकजन्य डासांपासून होणाऱ्या आजारापैकी डेंग्यू हा मानवीय दृष्ट्या जीवघेणा ठरतो, त्या अनुषंगाने लोकांपर्यंत या आजाराविषयी जनजागरण होण्याच्या दृष्टीने 16 मे या दिवशी डेंग्यू दिवस म्हणुन साजरा करण्यात आला.
जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.देवराम लांडे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर तथा वैद्यकीय अधिकारी डॉ.अर्चना पाटील व तालुका हिवताप पर्यवेक्षक-जगदीश बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली डेंग्यू दिवस साजरा करण्यात आला.
प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ अर्चना पाटील, आरोग्य सहाय्यक-प्रकाश पारधी, समुदाय आरोग्य अधिकारी-डॉ राहुल पाटील, डॉ. दिनेश चौधरी, सौ डॉ.महाजन, डॉ. भुषण देशमुख, आरोग्य सहाय्यीका-शोभा चौधरी,प्रयोगशाळा तंत्रज्ञ अधिकारी-गणेश महाजन, आरोग्य सेवक-विजय देशमुख, महेंद्र पाटील, अविनाश चव्हाण, संतोष भांडवलकर, धुडकु वारडे, आरोग्य सेविका-उज्वला परदेशी, निवेदिता शुक्ल, सुनीता दुधे, आशा धनगर, सचिन महाजन, मनोज चावरे,अजय भोई संजय बोरसे... आरोग्य केंद्रातील आदी सर्व कर्मचारी वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रसंगी तालुका हिवताप पर्यवेक्षक-बाविस्कर यांनी गावातील जमलेल्या लोकांना.. डेंग्यू या आजाराविषयी, खलील सखोल माहिती व मार्गदर्शन केले.
डेंग्यू ताप (हाडमोडी ताप) हा ताप एक प्रकारच्या विषाणूंमुळे होतो. हा आजार एडीस जातींच्या डासांमार्फत पसरतो.
डास चावल्यावर ३ ते १० दिवसांत थंडीताप, खूप अंगदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी, इ. त्रास सुरू होतो. या विषाणूंना खास औषध नाही. हा आजार साथीने येतो, त्यामुळे तो ओळखणे सोपे असते. साथीच्या सुरुवातीस मात्र थोडे रुग्ण असल्याने ओळखणे थोडे अवघड जाते.
रोगनिदान-
साधारणपणे हा आजार ५ ते ७ दिवसांत आपोआप बरा होतो. पण काही जणांना रक्तस्रावाचा त्रास सुरू होतो. हिरड्या, नाक, जठर, आतडी यांतून रक्तस्राव व्हायला सुरुवात होते. जठरातून रक्तस्राव झाल्यास उलटीत रक्त दिसते. आतड्यातून रक्तस्राव झाल्यास विष्ठा काळसर दिसते. त्वचेवर रक्ताचे बारीक ठिपके दिसतात. प्रत्यक्ष रक्तस्राव व्हायच्या आधी पण हा दोष ओळखता येतो.
रक्तदाब मोजण्यासाठी आवळपट्टी बांधली व १०० पर्यंत दाब निर्माण केला तर त्या हातावर असे लहान ठिपके तयार होतात, यावरून प्लेटलेट्स कमी झाल्याचे समजते. रक्तस्राव जास्त झाल्यास रक्तदाब कमी होतो आणि रुग्ण अत्यवस्थ होतो. याची लक्षणे म्हणजे घाम येणे, हातपाय गार पडणे, नाडी जलद चालणे, इ.
रक्त तपासणीत रक्त कणिकांचे प्रमाण २० हजाराच्या खाली गेल्यास रक्तस्रावाचा धोका जास्त असतो
== लक्षणे ==
लहान मुलांमध्ये मुख्यतः सौम्य स्वरूपाचा ताप येतो. मोठ्या माणसांमध्ये अधिक तीव्रतेचा ताप. सोबत डोके-डोळे दुखणे, अंगदुखी, अशक्तपणा, अंगावर लाल रंगाचा चट्टा येऊ शकतो. अंगदुखी तीव्र स्वरूपात असू शकते म्हणून याला हाडे मोडणारा ताप असेही म्हणतात.
एकदम जोराचा ताप चढणे
डोक्याचा पुढचा भाग अतिशय दुखणे
डोळ्यांच्या मागील भागात वेदना जी डोळ्यांच्या हालचालीसोबत अधिक होते
चव आणि भूक नष्ट होणे छाती आणि वरील अवयवांवर गोवरासारखे पुरळ येणे
मळमळणे आणि उलट्या त्वचेवर व्रण उठणे
२) डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप (डीएचएफ)
हा गंभीर स्वरूपाचा प्रकार असून यात तापाबरोबरच बाह्य रक्तस्राव - चट्टे उठणे, हिरड्यांमधून रक्तस्राव, अंतर्गत रक्तस्राव-आंतड्यांमधून रक्तस्राव, प्लेटलेट्सची संख्या कमी होणे इत्यादी प्रकार होऊ शकतात. तसेच छातीत, पोटामध्ये पाणी जमा होऊ शकते. बाकी लक्षणे डेंग्यू तापाप्रमाणेच असतात.
तीव्र, सतत पोटदुखी त्वचा फिकट, थंड किंवा चिकट होणे नाक, तोंड आणि हिरड्यातून रक्त येणे आणि त्वचेवर पुरळ उठणे
रक्तासह किंवा रक्ताविना वारंवार उलट्या होणे
झोप येणे आणि अस्वस्थता
रुग्णाला तहान लागते आणि तोंड कोरडे पडते
नाडी कमकुवतपणे जलद चालते
श्वास घेताना त्रास होणे
३) डेंग्यू अतिगंभीर आजार
ही डेंग्यू रक्तस्राराच्या तापाचीच पुढची अवस्था असून काही टक्के लोकांमध्येच ही दिसून येते. यात रुग्णाचे अस्वस्थ होणे, थंड पडणे, नाडी मंदावणे, रक्तदाब कमी होणे आणि शेवटी मृत्यू ओढवू शकतो.
-लक्षणांमध्ये उच्च ताप, डोकेदुखी, पुरळ आणि स्नायू आणि संयुक्त वेदना यांचा समावेश आहे. गंभीर प्रकरणांमध्ये गंभीर रक्तस्त्राव आणि शॉक आहे, जे जीवघेणा धोकादायक असू शकते. -ताप आणि वेदनादायक डोकेदुखी अचानक अचानक सुरू झाल्यामुळे ही फ्लूसारखी गंभीर आजार होण्याची शक्यता आहे. इतर लक्षणामध्ये त्वचेवर पुरळ, स्नायू आणि संयुक्त वेदना, मळमळ आणि उलट्या समाविष्ट होतात. अत्यंत प्रकरणांमध्ये, अत्याधिक रक्तस्राव (रक्तस्राव) आणि मृत्यू होऊ शकतो.
उपचार
नुसता डेंग्यू ताप असल्यास पॅमालच्या गोळया देऊन भागते. डेंगू रक्तस्राव असेल तर मात्र रुग्णालयात दाखल करून विशेष उपचार करावे लागतात.
प्रतिबंध
हा ताप डासांमार्फत पसरत असल्याने याच्या साथी वेगाने पसरू शकतात. रक्तस्रावाचा त्रास सहसा पंधरा वर्षाखालील मुलामुलींना होतो. इतरांनाही हा धोका थोडाफार असतोच. या साथीत अनेक मृत्यू झालेले आहेत. यासाठी अद्याप लस नाही.
प्रतिबंधक उपाययोजना म्हणून खालील सूचना आहेत.
साथीच्या काळात रुग्णांना मच्छरदाणीत आणि वेगळे ठेवणे.मच्छरदाणी वापरून डासांचे चावे टाळणे.डासरोधक मलम/ धूर यांचा वापर करून डासांना लांब ठेवणे.इडस डास हे जास्त करून शहरी वस्त्यांत आढळतात. या डासांवर पांढरे पट्टे असल्यामुळे ओळखायला सोपे जाते. डबे, मडकी, चाकांचे टायर्स, रिकाम्या नारळाच्या कवटया, इत्यादींमध्ये साचलेल्या पाण्यात इडस डास लवकर फैलावतात. यातले पाणी दर आठवडयाला काढून त्यांचा तळ ब्रशने घासावा लागतो तरच चिकटलेली अंडी निघतात. साथीच्या काळात अशा पाण्याच्या जागा निचरा करून डासांची उत्पत्ती टाळणे हा महत्त्वाचा भाग आहे. साथीच्या काळात झोपताना हातपाय झाकतील असे कपडे वापरावे. यासाठी पँट व लांब बाह्यांचा शर्ट वापरावा.
जगदीश बाविस्कर
हिवताप तालुका आरोग्य सहाय्यक चोपडा
