स्केटिंग स्पर्धेत चार वर्षांत एकदाही हार न होता राष्ट्रीय मैदाने गाजविणाऱ्या कु. तेजस्विनी विनोद सोनवणे हिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव.. सामान्य कुटुंबातील कन्येनेअद्वितीय काम केल्याने अनेकांच्या तोंडात बोटं..!*
जळगाव दि.३० ( प्रतिनिधी): येथील वाल्मिक नगर भागातील रहिवासी कु. तेजस्विनी विनोद सोनवणे हिने स्केटिंग स्पर्धेत अगदी कमी वयात राष्ट्रीय पातळीवर चकम दाखवून जळगावच्या नावाचा गवगवा विदेशात केल्याने तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.नुकताच तिने दीपनगर व भुसावळ येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत ही सुवर्ण पदक पटकावून विजयाची गूंज अबाधित ठेवली आहे.
कु. तेजस्विनी विनोद सोनवणे हिने वयाच्या 7 वर्षा पासून स्केटिंग हा खेळत आहे तरी ती आता पर्यंत जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी केली आहे व 4 वर्षापासून अपराजित आहे आणि गोव्याला तिची राष्ट्रीय स्पर्धेत निवड झाली व तिने राष्ट्रीय स्पर्धेत 2 ब्राँझ 1 कांस्य पदक पटकावले आहेत व नुकत्याच दीपनगर व भुसावळ येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत ही तिने सुवर्ण पदक पटकावले आहे .Arsec Asia Asiatic online events मध्ये ही तिने 200मीटर च अंतर 27.12सेकंदात पार केलं होतं व त्यात ही तिला सुवर्ण पदक प्राप्त झाले होते.तरी याचे सर्व श्रेय तीचे स्केटिंग प्रशिक्षक व पोलिस कॉन्स्टेबल सौ. जागृती काळे मॅडम यांना जाते.ती वाल्मिकी नगरातील रहिवासी विनोद सोनवणे यांची कन्या आहे.तिच्या यशामुळे तिचे परिसरासह जिल्ह्यातून जोरदार अभिनंदन होत आहे.