भूगोल विभागातर्फे स्वागत व निरोप समारंभ संपन्न

 


भूगोल विभागातर्फे स्वागत व निरोप समारंभ संपन्न

भडगाव दि.३०(प्रतिनिधी):  येथील एस.आर.एन.डी. महाविद्यालयात द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचे त्रूतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांकडून वृक्ष लागवटीकरीता कूंड्या देऊन भूगोल विभागात स्वागत करण्यात आले तर द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांकडून तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना निरोप देऊन पूढच्या वाटचालीकरीता शूभेच्छा देण्यात आल्या. या सामूहीक कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डाॅ. एन. एन. गायकवाड सर होते. प्रमूख वक्ते म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य मा. प्रा. एस. आर. पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूगोल विभाग प्रमूख मा. प्रा. डाॅ. एस. डी. भैसे यांनी केले तर कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी मा. प्रा. डी. ए. मस्की यांनी पार पाडली. मंचावर भूगोल विभागाचे वरीष्ठ प्रा. एल. जी. कांबळे उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी कार्यक्रमाच्या आयोजनाबाबतीत विद्यार्थ्यांचे कौतूक केले. उपप्राचार्यांनी विद्यार्थ्यांना वेळ व काळाचे भान ठेवून निर्णय घ्या असे सूचविले. प्राचार्य व अध्यक्षांनी विद्यार्थ्यांना भविष्यात कोणत्याही मदतीस महाविद्यालयाची दारे तूमच्याकरीता उघडी आहेत हे सांगीतले. कांबळे सरांनी विद्यार्थ्यांचे यश चिंतले तर प्रा. डी. ए. मस्की यांनी पूढील जीवनात यशस्वी होण्याचा व आपल्या पायावर उभे राहण्याचा गुरुमंत्र दिला. यात अश्वीनी इंगळे, अश्वीनी पाटील, विक्की पवार, वैश्नवी देशले, भारती राजपूत इ. विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कू. विद्या कोमल वाघ हिने अत्यंत उत्कृष्ट पध्दतीने केले तर आभार प्रदर्शन पंकज पवार या विद्यार्थ्याने केले. कार्यक्रम राष्र्टगिताने संपन्न झाला व अल्पोपहार देण्यात आला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने