*आर.सी. पटेल पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा चक्कर पडल्याने दूर्दैवी मृत्यू*

 



*आर.सी. पटेल पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा चक्कर पडल्याने दूर्दैवी मृत्यू*

शिरपूर दि.०३(प्रतिनिधी) : कॉलेजमध्ये मित्रांसोबत आलेल्या विद्यार्थ्याचा अचानक चक्कर येवून जमिनीवर पडल्याने मृत्यू झाला. ही घटना आर.सी. पटेल पॉलिटेक्निक महाविद्यालयात घडली. जयेश पावजी धनगर (18, कुरखळी, ता.शिरपूर) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात तो शिक्षण घेत होता. दरम्यान, बेशुद्धावस्थेत तरुणाला उपचारार्थ धुळे येथे हलवण्यात आल्यानंतर त्याची प्राणज्योत मालवली.
जयेश हा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात आर.सी.पटेल पॉलिटेक्निक महाविद्यालयात शिकत होता. नेहमीप्रमाणे कॉलेजमध्ये  मित्रांसोबत जेवत असतांना अचानक चक्कर येऊन पडल्याने त्यास प्रा. नितीन बोरसे यांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी अधिक उपचारासाठी धुळे येथे हलविले पण उपचारादरम्यान धुळे येथे जयेशचा मृत्यू झाला. म त्यूची माहिती गावात मिळताच गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.जयेशचे वडील पावजी धनगर हे आदर्श माध्यमिक विद्यालयात शिपाई म्हणून कार्यरत आहेत. त्याच्या पश्चात आई- वडील, व एक बहीण असा परीवार आहे. तरुणाच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने