*सौ. सु. गि. पाटील माध्यमिक विद्यालय भडगाव येथे एस एस सी परीक्षा बैठकव्यवस्था

काल्पनिक चित्र


सौ. सु.  गि.  पाटील माध्यमिक विद्यालय भडगाव येथे एस एस सी परीक्षा बैठकव्यवस्था
 

        भडगाव दि.१५( प्रतिनिधी) येथील सौ सुमनताई गिरधर पाटील माध्यमिक विद्यालयात, भडगाव अ 3150-1 या केंद्राची बैठकव्यवस्था डी 157030 ते 157217 व अतिरिक्त बैठकव्यवस्था डी 201520 डी 201524, 202083 असे एकूण 194 परीक्षार्थी परीक्षेस प्रविष्ट आहेत. परीक्षेच्या दिनांक 15 मार्च पासून सुरू होणाऱ्या सर्व विषयांचे पेपर मूळ इमारतीत पहिल्या मजल्यावर होतील. त्यासाठी परीक्षेच्या दृष्टीने केंद्रसंचालक मुख्याध्यापक श्री. विश्वासराव साळुंखे, उपकेंद्रसंचालक पर्यवेक्षक श्री. एस एम पाटील यांनी संपूर्ण तयारी केली असून परिक्षार्थ्यांनी लेखन साहित्य, मास्क, पाण्याची बाटली आपल्यासोबत आणायचे आहे. 

    सर्व परिक्षार्थ्यांनी परिक्षेपूर्वी अर्धा तास अगोदर उपस्थित राहायचे आहे. तसेच पालकांनी करोनाचे नियम पाळावेत, विनाकारण परीक्षा केंद्रावर गर्दी करू नये. असे आवाहन मुख्याध्यापक श्री. विश्वासराव साळुंखे यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने