*अ.भा.कोळी समाज शाखेच्या धुळे जिल्हध्यक्षपदी गिरधर आप्पा महाले यांची निवड*
धुळे दि.२८( प्रतिनिधी) येथील कोळी समाजाचे सक्रिय सामाजिक कार्यकर्ते गिरधर आप्पा दाजमल महाले यांची अ.भा.कोळी समाज शाखेच्या जिल्हाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.त्यांच्यानिवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
ठाणे येथे अखिल भारतीय कोळी समाज महाराष्ट्र शाखेचे प्रदेशाध्यक्ष परेशभाई कोळी यांचा अध्यक्षतेखाली बैठक होऊन त्यात ही उपरोक्त निवड करण्यात आली आहे.तसेच 24 एप्रिल रोजी सुवर्ण महोत्सव कार्यक्रमाचे नियोजन करण्याचे ठरले या कार्यक्रमास महामहिम राष्ट्रपती महोदय रामनाथजी कोविंद यांना विशेष आमंत्रित करण्यात येणार आहे. त्यात समाज वरील अन्यायाची समस्या माडण्याचा ठराव सामंत झाला तसेच 4 जिल्हा कार्यकारणी बदलण्यात आली आहे.नुतन जिल्हाध्यक्ष असे नंदुरबार जिल्हा अध्यक्षपदी श्री सूकलाल दौलत कोळी, धुळे जिल्हा अध्यक्ष पदी श्री गिर धर अप्पा दाजमल महाले, नासिक जिल्हा अध्यक्ष पदी श्री संजय गोरख शिंदे, नाशिक महिला अध्यक्ष कल्पना ताई श्याम पिठे, जळगाव जिल्हा अध्यक्ष पी डी बाविस्कर, , राज्य सचिव पदी श्री अॕड.अनिल नन्नवरे, खानदेश महिला प्रदेश अध्यक्ष पदी अॕड. शोभाताई खैरनार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.याप्रसंगी कोळी समाज कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.