*नवीन प्रभाग रचनेच्या हरकतींसाठी ,..उरले अवघे तीन दिवस....*



*नवीन प्रभाग रचनेच्या हरकतींसाठी ,..उरले अवघे तीन दिवस....*

दोंडाईचा-दि.१५ (प्रतिनिधी)* येथे नगरपालीकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाकडून नुकतीच दिनांक १० मार्चपासुन प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र नवीन-सुधारित प्रभाग रचना अनेक इच्छुक-भावी उमेदवारांना आर्थिक-मानसिक-शारीरिक व विकासात्मक दुष्ट्या त्रासदायक ठरत असल्याने शासनापुढे हा विषय हरकती-तक्रारी करून मांडेल कोण ? ह्या विवंचनेतून हरकती घेण्यासाठी मोजून तीन दिवस म्हणजे १७ मार्चपर्यंत वेळ असल्याने, जर पुढाऱ्यांनी हरकती घेण्यास पुढाकार दाखवला नाहीतर अनेक विश्वासू-लाभार्थी-निष्ठावंत कार्यकर्ते त्यांना फारकत द्यायच्या तयारीत असल्याचे मत *जनमत* जवळ आगामी नगरपालीका निवडणूकीत उमेदवारी करणाऱ्या इच्छुक-भावी उमेदवारांनी बोलून दाखविले आहे 

राज्यात ज्या-ज्या नगरपालीकांचा  कार्यकाळ डिसेंबर २०२१ मध्ये संपुष्टात आला होता.त्या-त्या नगरपालिकांवर सरकारने प्रशासकीय अधिकारी नियुक्त केले आहे. त्यात आज प्रशासक बसायला जवळपास अडीच महिने झाल्यावर, निवडणुक आयोगाने राज्य शासनाच्या निर्णयाची वाट बघत,नुकतीच प्रभाग रचना प्रसिद्ध करून, दिनांक १७ मार्चपर्यंत नागरिकांच्या व इच्छुक-भावी उमेदवारांच्या हरकती मागविण्यात आल्या आहेत.मात्र नवीन तयार करण्यात आलेली प्रभाग रचना प्रत्येकाची डोकेदुखी ठरून, खासकरून इच्छुक-भावी उमेवारांची निवडून येण्यासाठी काटेवरची कसरत राहणार आहे. म्हणून एकवेळा जर ही प्रभाग रचना बदलली नाही व जशीच्या तशी राहिली तर अनेकांचा आर्थिक-मानसिक-शारीरिक व विकासात्मक दुष्ट्या त्रासदायक ठरणार आहे. त्यासाठी   नगरपालीका निवडणुकीत उभे राहणारे सर्वच उमेदवार डोक्याने हुशारच असतील,असा भाग नाही आहे. त्यापैकी एखादाच हुशार निघून, तो चुकीच्या वाटणाऱ्या गोष्टींवर हरकती-तक्रारी नोंदवतो,बाकी बरेचजण नेतेगंण व पक्षप्रमुखांच्या हालचालींवर अवलंबून असतात. मात्र दोंडाईचा नगरपालीका नवीन प्रभाग रचनांच्या हरकती घेण्यासाठी बोटावर मोजता येईल इतके म्हणजे तीनच दिवस बाकी असल्याने सर्वसामान्य नागरिकांसह इच्छुक-भावी उमेदवार बुचकाळ्यात पडलेले असुन, अनेकांनी शनिवार व रविवारी आपल्या नेते-पक्षप्रमुखांची भेट घेत, नवीन प्रभाग रचनेत येत असलेल्या अडचणी सांगत. बदल केला तर बरे होईल. अन्यथा जर तुम्ही हरकत घेत नसणार तर आम्ही दुसरा नेता-पक्षप्रमुख शोधत, तुम्हाला फारकत देवू व येणाऱ्या निवडणुकीत निवडून येऊ,असाही सोज्वळ दम भरला असल्याचे शेवटी जनमत जवळ बोलून दाखविले. म्हणुन आतातरी नेतेगंण-पक्षप्रमुख मंडळी पुढील तीन दिवसात मा.मुख्याधिकारी व मा.जिल्हाधिकारी यांच्याकडे हरकती-तक्रारी नोंदवतील,अशी अपेक्षा इच्छुक-भावी उमेदवार करत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने