नको त्या जागेवर त्या प्राध्यापकाने चाकूने केले सपासप वार..पत्नीची अशीही क्रूर हत्या.. अंगावरील शहारे थांबता थांबेनात..!
यवतमाळ दि.१५(प्रतिनिधी धीरज खेडेकर) : पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे . पतीने राहत्या घरी पत्नीवर चाकूने वार केल्याचा आरोप आहे . धक्कादायक म्हणजे आरोपी पती मारोती अरके हा व्यवसायाने प्राध्यापक आहे . चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते . मात्र उपचार दरम्यान यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात विवाहितेचा मृत्यू झाल्याची माहिती आहे . पत्नीच्या हत्येप्रकरणी मारोती अरके याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल आहे . दारुच्या नशेत कौटुंबिक कारणावरुन पती नेहमी पत्नीला मारहाण करत असल्याचा दावा केला जात आहे . विमल मारोती अरके असे मयत महिलेचं नाव आहे . यवतमाळ जिल्ह्यात आर्णी शहरातील स्वामी समर्थ नगर मध्ये रहिवासी असलेले प्राध्यापक मारोती आरके हे लोणी येथील राष्ट्रीय आश्रम उच्च माध्यमिक विद्यालयावर प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे . त्यांना नियमित मध्यपानाची सवय असल्याने घरी रोजच पत्नी विमल सोबत भांडण करायचे काल हे भांडण विकोपाला गेले . दुपारी प्राध्यापक मारोती आरके यांनी पत्नी विमल आरके हिच्या गुप्त अंगावर चाकूने सपासप वार केले . त्यामध्ये विमल ही गंभीर जखमी झाली . तिला उपचारासाठी यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारा दरम्यान रात्री एकच्या सुमारास तिचा मृत्यू झाला . मृत विमलला आठ आणि पाच वर्षांची दोन लहान मुले आहेत . प्राध्यापक मारोती आरके यांने स्वत पोलीस स्टेशनला गुन्हा झाल्याचे सांगून आत्मसमर्पण केले आहे . शिक्षण क्षेत्राला कलंक लावणारी घटना असून या घटनेचा शिक्षण वर्गाकडून तीव्र रोष व्यक्त केल्या जात आहेत