चोपडा येथे मोफत रोग निदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो रुग्णांनी घेतला लाभ..आमदारांकडून डॉक्टरांचा सत्कार !*


 *चोपडा येथे मोफत रोग निदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो रुग्णांनी घेतला लाभ..आमदारांकडून डॉक्टरांचा सत्कार !* 

चोपडा ३० मार्च / प्रतिनिधी:

येथील उपजिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय आरोग्य अभियान व जिल्हा रुग्णालय जळगाव राज्य आरोग्य सोसायटी महाराष्ट्र शासन अंतर्गत आदिवासी व ग्रामीण भागातील जनतेसाठी दि. २८ रोजी प्रारंभ झालेल्या मोफत सर्व रोग निदान, दंत व शस्त्रक्रीया शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून सदर शिबिराचे उद्घाटन आम दार सौ. लताताई सोनवणे यांच्याहस्ते करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज पाटील यांच्यासह अन्य डॉक्टरांनी व नर्से स यांनी अथक परिश्रम घेत उपजिल्हा रुग्णालयात उत्कृष्ट सेवा दिल्यामुळे आमदार सौ. लताताई सोनवणे, माजी आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. तसेच शिबिरास उपस्थित असलेल्या शिवसैनिकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पंचायत समितीचे माजी उपसभापती एम. व्ही. पाटील, तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख विकास पाटील, शहरप्रमुख आबा देशमुख, नरेश महाजन, युवासेनेचे दीपक चौधरी, संगायो समितीचे सदस्य संजीव शिरसाठ, ए. के. गंभीर सर, माजी जि.प.सदस्य हरीष पाटील आदी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने