संगीत सह्याद्रीच्या वतीने नाट्यविभाग प्रमुख पदी विनायक खानविलकर यांची निवड
कोकण दि.०३(शांताराम गुडेकर ):संगीत सह्याद्री रत्नागिरीच्या वतीने आपण नाट्य क्षेत्रामध्ये पदार्पण करत आहोत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात असणारी नाट्य मंडळ, नाट्य कलाकार या सर्वांनाच आपल्या हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी संगीत सह्याद्रीच्या वतीने एक पाऊल पुढे टाकत आहोत.संगीत सह्याद्रीच्या माध्यमातून संगीत क्षेत्रामध्ये येणाऱ्या गायकांना संगीत सह्याद्री म्हणजे हक्काचं आपल व्यासपीठ आणि त्यामुळेच रत्ननगरीचे हे कलाकार आपल्या समोर येत आहेत.रत्ननगरीने प्रत्येक क्षेत्रासाठी अनेक रत्न दिली आहेत. त्यातील नाट्य अभिनेते अमोल मयेकर , राजेशजी गोसावी, भूषण बर्वे अशा दिग्गज कलाकारांच्या माध्यमातून नाट्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या ग्रामीण भागातील तरुणांना आपण लवकरच संगीत सह्याद्रीच्या वतीने कार्यशाळा सुरू करणार आहोत. त्याचबरोबर संगीत क्षेत्रामध्ये रत्नागिरीचे नाव पुढे घेवून जाणाऱ्या माझ्या संगीत कलाकारांचाही यथोचित सन्मान करण्याचा मानस आहे. यासाठी तुम्हा सर्वांचेच मार्गदर्शन आणि आशीर्वाद असावेत हीच सदिच्छा. संगीत सह्याद्रीच्या वतीने नाट्य विभाग प्रमुख म्हणून माझी केलेली निवड माझ्या पुढील कामासाठी निश्चितच प्रेरणा देणारी असेल असे मत खानविलकर यांनी व्यक्त केले.संगीत सह्याद्रीच्या वतीने नाट्यविभाग प्रमुख पदी विनायक खानविलकर यांची निवड झाल्याबद्दल अनेकांनी त्यांना अभिनंदनसह शुभेच्छा दिल्या आहेत.